शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

चाळीस एकराचा गोपाळा तलाव गिळंकृत करण्याचा 'बिल्डर लॉबी'चा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 18:52 IST

उमरेडचा गोपाळा तलाव विनापरवानगीने बुजविण्याचे काम युद्धस्तरावर : पालिकेला खबरच नाही

अभय लांजेवार लोकमत न्यूज नेटवर्कउमरेड : देशभरात बहुतांश भागात आजही पाण्यासाठी भटकंती करावी लागते. जलस्रोत कसा वाढवायचा यावर शासन-प्रशासनाचे चिंतन सुरू आहे. असे असताना चक्क चाळीस एकरात विस्तारलेला तलावच गिळंकृत करण्याचा सपाटा उमरेड येथील गोपाळा तलावावर 'बिल्डर लॉबी'ने सुरू केला. अर्धा डझन जेसीबी, डझनभर ट्रक-टिप्पर आर्दीच्या माध्यमातून तलावात माती टाकण्याचे आणि तलाव बुजवून सपाट करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

उमरेड रेल्वेस्टेशन मागील झोपडपट्टीला लागूनच पुरातन काळातील गोपाळा तलाव आहे. त्याचा भूमापन क्रमांक ३५३ असून ३७ एकर (१४.२७हेक्टर) क्षेत्रात तलावाचा विस्तार आहे. वर्षभर या तलावात पाणी असते. नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात गोपाळा तलाव येतो. शंभर वर्षापेक्षाही अधिक जुना असलेला हा तलाव शिंगाडे आणि मासेमारीसाठी सर्वदूर प्रसिद्ध आहे.

विकास योजनेअंतर्गत मंजूर झालेला हा तलाव चौफेर ग्रीन बेल्ट प्रस्तावित आहे. नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असूनही पालिका प्रशासनाला या तलावात नेमके काय सुरू आहे, याची साधी कल्पना नाही. प्रस्तुत प्रतिनिधीने याबाबत पालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता, अद्याप कुणीही परवानगी घेतली नाही. आम्हाला याबाबत माहिती नाही, असे आश्चर्यकारक उत्तर मिळाले. तब्बल ४० एकरातील 'जलस्रोत' संपविण्याचा हा डाव कुणाच्या आशीर्वादाने सुरू असावा, यावरही तर्कवितर्क लढविले जात आहे. रात्रंदिवस तलाव बुजविण्याचे काम युद्धपातळीवर येथे सुरू असून, नगरपालिका प्रशासनाच्या नाकावर टिच्चून विनापरवानगीने हा सारा प्रकार राजरोसपणे केला गेला. या प्रकारामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पाणीस्रोत संरक्षण कायदेअंतर्गत कारवाईची मागणी केली जात आहे.

मृत तलाव जिवंत करायचे सोडून...उमरेड शहरात पूर्वी विहिरींची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. घरासमोरील विहीर बुजवायची असेल, तर नगरपालिकेची परवानगी लागते. असे असताना विनापरवानगीने अख्खा तलावच बुजविला गेला. ही बाब संशयावर बोट ठेवणारी आहे. उपलब्ध पाणीस्रोताचा उपयोग योग्य करून विकासकामे साधणे काळाची गरज आहे. शिवाय काही मृत तलाव, बोढी जिवंत करण्याचे काम सोडून उपयुक्त जलस्रोत संपविण्याचे पाप अयोग्य असल्याच्या उमरेडकरांच्या प्रतिक्रिया आहेत.

लगेच ले-आउट पडणारशंभर वर्षापेक्षा अधिक आयुष्य असलेल्या या तलावाला विनापरवानगीने बुजविण्याचे काम लवकरच पूर्ण होईल. अवघ्या काही महिन्यातच याठिकाणी ले-आउटचे कामही सुरू केले जाईल, अशी विश्वसनीय माहिती आहे. 

"गोपाळा तलाव नगरपालिका कार्यक्षेत्रात येतो. तलाव बुजविण्याचे काम सुरू असल्याची माहिती नाही. मी चौकशी करते. तलाव खासगी असला तरी या कामाची कोणतीही परवानगी घेतल्या गेली नाही. संबंधितांना नोटीस बजावून पुढील कारवाई केली जाईल."- अर्चना मेंढे, मुख्याधिकारी, नगर परिषद, उमरेड

टॅग्स :fraudधोकेबाजीnagpurनागपूरumred-acउमरेड