शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

Budget 2019 : अजनी सॅटेलाईट टर्मिनलवर रेल्वेमंत्र्यांची कृपादृष्टी :आठ कोटींची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 12:44 AM

अर्थ आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात अजनीत सॅटेलाईट टर्मिनल साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अजनी सॅटेलाईट टर्मिनलसाठी अर्थसंकल्पात आठ कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. मागील अर्थसंकल्पात अजनी सॅटेलाईट टर्मिनलची घोषणा करण्यात आली होती. आठ कोटी मिळाल्यामुळे अजनी रेल्वेस्थानकावर प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध होऊन भविष्यात या स्थानकावरून नव्या गाड्या सुरु होण्याची शक्यता वाढली आहे.

ठळक मुद्देगोधनी, खापरी होणार आदर्श रेल्वेस्थानक

दयानंद पाईकराव/आनंद शर्मा/लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अर्थ आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात अजनीत सॅटेलाईट टर्मिनल साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अजनी सॅटेलाईट टर्मिनलसाठी अर्थसंकल्पात आठ कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. मागील अर्थसंकल्पात अजनी सॅटेलाईट टर्मिनलची घोषणा करण्यात आली होती. आठ कोटी मिळाल्यामुळे अजनी रेल्वेस्थानकावर प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध होऊन भविष्यात या स्थानकावरून नव्या गाड्या सुरु होण्याची शक्यता वाढली आहे.अर्थसंकल्पात खापरी, गोधनी आणि माजरी रेल्वेस्थानकाला आदर्श रेल्वेस्थानकाच्या रुपाने विकसित करण्यासाठी आणि गोधनी रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्मची उंची वाढविण्यासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे भविष्यात या रेल्वेस्थानकांचे महत्त्व वाढणार आहे. अर्थसंकल्पात १३.७ किलोमीटर लांबीच्या गोधनी-कळमना कॉर्ड लाईनसाठी २ कोटी, गोधनी-नागपूर-खापरी ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टीमसाठी ६ कोटी, अजनीत इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट फॉर अ‍ॅडव्हान्स इलेक्ट्रॉनिक टेक्नालॉजीसाठी ६ लाख रुपये देण्यात आले आहेत तर अजनी लोकोशेडची क्षमता वाढविण्यासाठी १.५ कोटी रुपये, अजनीत प्रस्तावित नव्या इलेक्ट्रिक लोकोशेडच्या निर्मितीसाठी २ कोटी ५५ लाख ११ हजार रुपये देण्यात आले आहेत. नागपूर रेल्वेस्थानकाच्या यार्डातून ‘डायमंड’ हटविण्यासाठी १० लाख रुपयांची आणि ११ किलोमीटर लांबीच्या चिरीमिरी-नागपूर पॅसेंजर हॉल्ट (नवी लाईन) साठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.रेल्वे क्वॉर्टरमधील समस्या सुटणारअर्थसंकल्पात रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडेही लक्ष पुरविण्यात आले आहे. अजनीतील रेल्वे क्वॉर्टरची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात क्वॉर्टरचे छत टपकतात. क्वॉर्टरमधील बहुतांश शौचालयांना दरवाजे नाहीत. अशा स्थितीत अर्थसंकल्पात रेल्वे क्वॉर्टरसाठी ४.४३ कोटी रुपयांची तरतूद केल्यामुळे रेल्वे क्वॉर्टरमधील समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.‘एफओबी’मुळे होणार नाही चेंगराचेंगरीनागपूर रेल्वेस्थानकावर इटारसी एण्डकडील भागात प्लॅटफार्म क्रमांक १ ते ८ पर्यंत नवा रुंद फूट ओव्हरब्रिज तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ५ कोटी ९ लाख ९९ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा फूट ओव्हरब्रिज साकारल्यास प्रवाशांना एका प्लॅटफार्मवरून दुसऱ्या प्लॅटफार्मवर जाताना गर्दी होऊन चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण होणार नाही. तर नागपूर रेल्वेस्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक १, २ आणि ३ सरळ करण्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे रेल्वेगाड्या आऊटरवर उभ्या राहणार नाहीत.आरपीएफच्या पाच नव्या पोस्ट, महिलांसाठी बॅरेकदक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलासाठी पाच नव्या पोस्ट आणि महिलांसाठी बॅरेक तयार करण्यात येणार आहे. यासाठी ६ कोटी १ लाख ७९ हजार रुपये खर्च येणार आहे. अर्थसंकल्पात यासाठी ६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.नागपूर-नागभीड प्रकल्पाची उपेक्षावर्षानुवर्षे नागपूर-नागभीड या १०६ किलोमीटर लांबीच्या ब्रॉडगेज प्रकल्पाचे काम रखडले आहे. या अर्थसंकल्पात या प्रकल्पाता गती मिळण्याची अपेक्षा असताना या प्रकल्पासाठी तुटपुंजी १० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एवढी कमी तरतूद केल्यामुळे हा प्रकल्प साकारण्यासाठी आणखी काही वर्षे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा प्रकल्प साकार झाल्यास विद्यार्थी, ग्रामीण भागातील नागरिक, शेतकºयांना त्याचा लाभ होणार आहे, हे विशेष.

 

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019railwayरेल्वे