बसपा करणार भाजपच्या भ्रष्ट्राचाराची पोलखोल; नागपुरातून सुरुवात
By आनंद डेकाटे | Updated: August 31, 2022 18:12 IST2022-08-31T18:06:57+5:302022-08-31T18:12:26+5:30
बसपा आगामी महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार, पक्षाचा महापौर करण्याचा संकल्प

बसपा करणार भाजपच्या भ्रष्ट्राचाराची पोलखोल; नागपुरातून सुरुवात
नागपूर : भाजपने केलेल्या भ्रष्ट्राचाराची पोलखोल बसपा करणार असून याची सुरुवात नागपुरातून केली जाईल, अशी माहिती बसपाच्या प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने आणि महाराष्ट्र प्रभारी प्रमोद रैना यांनी बुधवारी रविभवन येथे पत्रकार परिषदेत दिली.
ताजने यांनी सांगितले, नागपूर महापालिकेत दोन दशकापासून भाजपची सत्ता आहे. मुख्यमंत्री भाजपचे होते, आताही भाजपचे उपमुख्यमंत्री आहे, तरी नागपूरला भकास केले आहे. भाजप ने केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली जाईल, प्रत्येक वार्डात कार्यक्रम होतील. बसपा आगामी महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहे. पक्षाचा महापौर करण्याचा संकल्प आहे.
काँग्रेस - भाजप सारखेच
या देशात आरक्षणाची अमलबजावणी होऊ नये, यासाठी काँग्रेस ने काम केले, तर आरक्षण लागू होऊच नये यासाठी भाजपचा जन्म झाला आहे, अशी टीकाही ताजने आणि रैना यावेळी केली.