भावाच्या मित्राने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2023 21:28 IST2023-03-30T21:27:30+5:302023-03-30T21:28:02+5:30
Nagpur News घरी येणे जाणे असलेल्या भावाच्या मित्रानेच १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी २९ मार्चला रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

भावाच्या मित्राने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग
नागपूर : घरी येणे जाणे असलेल्या भावाच्या मित्रानेच १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी २९ मार्चला रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
अक्षय जितेंद्र ठाकरे (२५, उमरेड रोड, दिघोरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी अक्षयचे वडिल वेल्डींगचे काम करतात. घरीच त्यांनी दुकान टाकले आहे. आरोपी अक्षय वडिलांसोबत काम करतो. पिडीत अल्पवयीन मुलगी ११ व्या वर्गात शिकते. अल्पवयीन मुलीच्या भावाचा आरोपी मित्र आहे. त्यामुळे त्याचे तिच्या घरी येणे-जाणे होते. परंतु आरोपी अक्षयने मित्राच्या बहिणीचा पाठलाग सुरु केला. तो तिच्या इच्छेविरुद्ध तिला विविध अॅपद्वारे मॅसेज पाठवून त्रास देत होता. दरम्यान आरोपीने बुधवारी पिडित अल्पवयीन मुलीला सार्वजनिक ठिकाणी थांबवून तिच्याशी गेरवर्तन केले आणि तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. पिडीत अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वरचे उपनिरीक्षक चंद्रकांत पाचोडे यांनी आरोपीविरुद्ध कलम ३५४, ३५४ (ड), सहकलम १२, पोक्सो नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.