एका दिवसासाठी भाऊ बहिणीच्या घरी गेला; चोरट्याने बंद घरातून रोख, दागिने नेले

By दयानंद पाईकराव | Updated: September 8, 2023 13:49 IST2023-09-08T13:49:33+5:302023-09-08T13:49:48+5:30

अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या बेडरुममधील खिडकी तोडून आत प्रवेश केला.

Brother went to sister's house for a day; The thief took cash, jewelery from the locked house | एका दिवसासाठी भाऊ बहिणीच्या घरी गेला; चोरट्याने बंद घरातून रोख, दागिने नेले

एका दिवसासाठी भाऊ बहिणीच्या घरी गेला; चोरट्याने बंद घरातून रोख, दागिने नेले

नागपूर : बहिणीच्या घरी गेलेल्या व्यक्तीच्या घरातील दागिने आणि रोख असा एकुण ३.८८ लाखांचा मुद्देमाल पळविणाऱ्या आरोपीविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

राहुल छत्रपती भाकरे (वय २६, रा. श्री दत्त प्रसन्न सोसायटी, हरिहरनगर दाभा) हे बुधवारी सहा सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजता कुटुंबासह आपल्या बहिणीच्या घरी गेले होते. ते सात तारखेला सकाळी ७.३० वाजता घरी परतले असता त्यांना आपल्या घरी चोरी झाल्याचे समजले. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या बेडरुममधील खिडकी तोडून आत प्रवेश केला.

आरोपीने आलमारीतील सोन्या-चांदीचे दागीने, कॅमेरा, डीव्हीआर, जुना मोबाईल व रोख ७० हजार असा एकुण ३ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

Web Title: Brother went to sister's house for a day; The thief took cash, jewelery from the locked house