भावाने केली बहिणीची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:26 IST2020-12-04T04:26:06+5:302020-12-04T04:26:06+5:30

सुनिता ढाकूलकर वर्धा येथील रहिवासी आहेत. त्यांच्या मालकीचा मौजा वानाडोंगरीत प्लॉट आहे. आरोपी संजय साखळेने सुनिता यांना अंधारात ठेवून ...

The brother cheated on his sister | भावाने केली बहिणीची फसवणूक

भावाने केली बहिणीची फसवणूक

सुनिता ढाकूलकर वर्धा येथील रहिवासी आहेत. त्यांच्या मालकीचा मौजा वानाडोंगरीत प्लॉट आहे. आरोपी संजय साखळेने सुनिता यांना अंधारात ठेवून १९ जून २०२० ला लाखोंची किंमत असलेला हा प्लॉट मोहम्मद इब्राहिम मुजावर यांना परस्पर विकून टाकला. ही फसवणूक उघड झाल्यानंतर सुनिता यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

----

गळफास लावून आत्महत्या

नागपूर - जरीपटक्यातील रहिवासी चरणजीतसिंग सलविंदरसिंग भुर्जी (वय ४५)यांनी गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. त्यांचे बंधू भूपेंद्रसिंग भुर्जी यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

----

Web Title: The brother cheated on his sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.