कुख्यात आंबेकरच्या बंगल्याची स्लॅब तोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 00:22 IST2020-09-09T00:21:41+5:302020-09-09T00:22:55+5:30
कुख्यात गुंड संतोष आंबेकर याचा दारोडकर चौकाजवळील त्याच्या पत्नीच्या नावे असलेल्या २५०० चौ.फूट क्षेत्रावरील चार मजली बंगल्याचे अतिक्रमण तोडण्यास मनपाच्या अतिक्रमण पथकाने सोमवारी सुरुवात केली. मंगळवारी चौथ्या मजल्यावरील स्लॅब तोडण्याला सुरुवात केली.

कुख्यात आंबेकरच्या बंगल्याची स्लॅब तोडली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात गुंड संतोष आंबेकर याचा दारोडकर चौकाजवळील त्याच्या पत्नीच्या नावे असलेल्या २५०० चौ.फूट क्षेत्रावरील चार मजली बंगल्याचे अतिक्रमण तोडण्यास मनपाच्या अतिक्रमण पथकाने सोमवारी सुरुवात केली. मंगळवारी चौथ्या मजल्यावरील स्लॅब तोडण्याला सुरुवात केली.
चौथ्या मजल्यापर्यंत पोकलँडने तोडकाम करता येत नसल्याने मशीनच्या साहाय्याने स्लॅब तोडावी लागत आहे. याला वेळ लागत आहे.
नेहा संतोष आंबेकर हिच्या नावे ही इमारत असून घर क्रमांक ४८४ असा आहे. सदर भाग हा झोपडपट्टी अंतर्गत येत असून या मालमत्तेसंदर्भात आंबेकर याचेकडे कुठलीही अधिकृत कागदपत्रे नसल्याने मनपा प्रशासनाने हा बंगला तोडण्याची कारवाई सुरू केली आहे.
तळमजला जवळपास २३१.७७ वर्गमीटर अर्थात सुमारे अडीच हजार वर्गफूट बांधकामाचे क्षेत्र असलेली चार मजली इमारत आहे. दाटीवाटीच्या क्षेत्रात ही इमारत आहे. पोकलँन्डने सर्व बांधकाम पाडणे शक्य नाही. त्यामुळे वरच्या मजल्यापासून पाडण्याला सुरुवात केली आहे. बांधकाम पाडण्यासाठी पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती सहायक आयुक्त अशोक पाटील यांनी दिली.