फरार गुन्हेगार आणा, एक हजाराचे बक्षीस मिळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 23:33 IST2021-05-26T23:31:28+5:302021-05-26T23:33:24+5:30
fugitive criminals कित्येक वर्षांपासून फरार असलेल्या ३६०० गुन्हेगारांच्या अटकेसाठी शहर पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. मंगळवारी रात्री सुरू केलेल्या या मोहिमेंतर्गत पहिल्याच दिवशी २६ फरार गुन्हेगार सापडले. प्रत्येक गुन्हेगाराच्या अटकेसाठी पोलीस कर्मचाऱ्यास हजार रुपयांचे बक्षीसही दिले जाईल. या अभियानामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह आहे. तर, गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

फरार गुन्हेगार आणा, एक हजाराचे बक्षीस मिळवा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कित्येक वर्षांपासून फरार असलेल्या ३६०० गुन्हेगारांच्या अटकेसाठी शहर पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. मंगळवारी रात्री सुरू केलेल्या या मोहिमेंतर्गत पहिल्याच दिवशी २६ फरार गुन्हेगार सापडले. प्रत्येक गुन्हेगाराच्या अटकेसाठी पोलीस कर्मचाऱ्यास हजार रुपयांचे बक्षीसही दिले जाईल. या अभियानामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह आहे. तर, गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.
शहर पोलीस विविध प्रकरणांमधील ३६०० फरार आरोपींचा शोध घेत आहे. अनेक गुन्हेगार तर १९८५ पासून आतापर्यंत फरार आहेत. ४० वर्षांत एकदाही त्यांना शोधण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करण्यात आलेले नाही. यापैकी अनेक गुन्हेगार तर शहरातच आपली ओळख बदलवून राहत आहेत. पोलिसांची नजर नसल्याने ते गुन्हेगारी कृत्यही करायचे. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखा आणि सर्व ठाणेदारांना फरार आरोपींना अटक करण्याचे निर्देश दिले. मंगळवारपासून चालवण्यात आलेल्या या मोहिमेत पहिल्याच दिवशी २६ फरार गुन्हेगारांना अटक करण्यात आली. सर्वाधिक जुने प्रकरण कोतवाली पोलीस ठाणेअंतर्गत दाखल होते. हल्ल्याच्या एका प्रकरणात गंगाबाई घाट येथील रहिवासी ६० वर्षीय शेख मलिक १९८९ पासून फरार होता. गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने मलिकला अटक केली.
पहिल्याच दिवशी मिळालेले यश व रोख रकमेच्या घोषणेमुळे अधिकारी-कर्मचारी उत्साहित आहेत. आंदोलनात फरार असलेले आरोपी सोडून इतर गुन्ह्यांमधील आरोपींच्या अटकेवर हजार रुपये बक्षीत दिले जाईल. याच मोहिमेंतर्गत सोमवारी लॅण्डमाफिया गौरव ऊर्फ अमरिंदर सिंह बग्गाचा साथीदार प्रशांत सहारे याला अटक करण्यात आली. बग्गा व सहारे यांनी वाठोडा येथे टवरलाल छावरिया कुटुंबाला ब्लॅकमेल करून जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी बुधवारी बग्गाच्या शोधात सात ते आठ ठिकाणी धाड टाकली. यात त्याचे नातेवाईक, मित्रांचा समावेश आहे. परंतु, बग्गा पोलिसांच्या हाती लागला नाही.