६० मीटर लांब पूल तोडला

By Admin | Updated: November 17, 2016 02:47 IST2016-11-17T02:47:20+5:302016-11-17T02:47:20+5:30

पूल एकूण ४०० मीटर लांब आहे. त्यात दोन्ही बाजूला ३०० मीटर अप्रोच रस्ता आहे. प्रत्यक्ष १०० मीटर उड्डाण पूल

The bridge broke 60 meters long | ६० मीटर लांब पूल तोडला

६० मीटर लांब पूल तोडला

मोठ्या क्रशर मशीन्सचा उपयोग : कडेकोट सुरक्षा
नागपूर : मोठ्या मशीन्सच्या मदतीने छत्रपती उड्डाण पुलाचे २० मीटरचे तीन टप्पे दुसऱ्या दिवशी बुधवारी रात्री तोडण्यात आले. कामाची गती पाहता ३० नोव्हेंबरपूर्वीच पूल जमीनदोस्त होऊन मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
४०० मीटर लांब पूल
पूल एकूण ४०० मीटर लांब आहे. त्यात दोन्ही बाजूला ३०० मीटर अप्रोच रस्ता आहे. प्रत्यक्ष १०० मीटर उड्डाण पूल २० मीटरच्या पाच टप्प्यामध्ये सहा मशरूम आकाराच्या पिलरवर उभा आहे. बुधवार रात्रीपर्यंत २० मीटरचे तीन टप्पे अर्थात ६० मीटर लांब पूल तोडण्यात आला. उर्वरित दोन टप्पे गुरुवारी तोडण्यात येणार आहे. याशिवाय दोन्ही बाजूकडील १५०-१५० मीटरचे रस्त्याचेही तोडकाम सुरू आहे.
बारीक तुकड्यांचा बांधकामात उपयोग
२० मीटर लांब एका टप्प्यात १४ गर्डर (स्लॅब) टाकण्यात आले आहेत. ते एवढे मजबूत आहेत की, तोडताना विशेष परिश्रम घ्यावे लागत आहे. तोडल्यानंतर त्याचे बारीक तुकडे करून नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या खापरी रोडवरील यार्ड ग्रेड विभागात नेण्यात येत आहेत. त्याला बारीक करून मेट्रो प्रकल्पाच्या बांधकामात किंवा डीपी रस्त्यांसाठी उपयोगात आणण्यात येणार
आहे.
६०० ट्रक मलबा हटविला
पूल तोडल्यानंतर रस्त्यावर पडलेला मलबा हटविण्याचे काम सुरू आहे. दोन दिवसात ६०० ट्रक कॉन्क्रिट मलबा हटविण्यात आला. याशिवाय पुलाच्या सळाकी कटरने तोडण्यात येऊन यार्ड ग्रेडमध्ये नेण्यात येत आहेत.
धूळीवर पाण्याचा मारा
पूल तोडताना मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. त्यामुळे काम करणाऱ्यांनी मास्क लावले आहेत. धूळ इतरत्र उडू नये म्हणून एका मशीनद्वारे त्यावर पाण्याचा मारा करण्यात येत आहे.

लोकांची गर्दी
पुलाच्या आठवणी मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी लोकांनी दुसऱ्या दिवशीही गर्दी केली होती. अनेकजण मुलांसोबत पुलाचे तोडकाम पाहात होते. अनेकांनी पूल तोडण्याचे व्हिडिओ तयार केले.
चारही बाजूला सुरक्षा व्यवस्था
रस्त्याच्या चारही बाजूला सुरक्षा रक्षक तैनात होते. लोक उत्सुकतेपोटी तोडकाम जवळून पाहण्यासाठी पुलाजवळ जात होते. पण त्यांना आत जाण्यास सुरक्षा रक्षक मनाई करीत होते. या रस्त्यावरील वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली असून, त्या ठिकाणीही जलद कृती पथक तैनात होते.

गडकरी व बावनकुळे यांची भेट
उड्डाण पुलाचे बांधकाम २००० मध्ये युती सरकारच्या काळात झाले. त्यावेळी नितीन गडकरी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते. या पुलाचे तोडकाम पाहण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी सायंकाळी भेट दिली आणि त्यांनी स्वत:चे नाव व ‘गूड मॅनेज वर्क’ असा शेरा त्यांनी पुलाच्या भिंतीवर लिहिला. याशिवाय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या स्थळी भेट देऊन तोडकामाची पाहणी केली.
पहिला टप्पा रात्री १.२० वाजता, दुसरा बुधवारी दुपारी १२.३० वाजता, तिसरा टप्पा रात्री १० वाजता तोडला.
६०० ट्रक मलबा हटविला
मलब्याचा मेट्रो प्रकल्पात उपयोग

Web Title: The bridge broke 60 meters long

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.