शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील मातीत फुलणार ब्राझीलची रसदार मोसंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 09:27 IST

भारतीय कृषी संशोधन परिषद-लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था (सीसीआरआय)ने येथील वातावरणाशी जुळवून घेतील अशा ब्राझिलमधील मोसंबीच्या पाच प्रजाती विकसित केल्या आहेत.

ठळक मुद्देसीसीआरआयचे यशस्वी संशोधनपंजाब, आसाममधून उन्नत प्रजातींचीही भर

आॅनलाईन लोकमतनागपूर : आपल्या रसदार गुणांमुळे ब्राझिलमध्ये लोकप्रिय असलेल्या मोसंबीच्या प्रजाती आता नागपूरसह विदर्भाच्या भूमीवर फुलणार आहेत. भारतीय कृषी संशोधन परिषद-लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था (सीसीआरआय)ने येथील वातावरणाशी जुळवून घेतील अशा ब्राझिलमधील मोसंबीच्या पाच प्रजाती विकसित केल्या आहेत. याशिवाय संस्थेने पंजाबमधील मोसंबीच्या तीन आणि आसाममधील लिंबाच्य प्रजातींची यशस्वीपणे लागवड केली आहे. या प्रजाती रोगमुक्त असून अधिक रसदार असल्याने प्रक्रिया उद्योगासाठी अधिक लाभदायक ठरतील, असा विश्वास सीसीआरआयचे संचालक डॉ. एम. एस. लदानिया यांनी व्यक्त केला.डॉ. लदानिया यांनी विकसित केलेल्या मोसंबी आणि लिंबूच्या विविध प्रजातीबाबत माहिती दिली. या प्रजाती संस्थेने २०१४ मध्ये ब्राझिलहून आयात करून त्यांची संस्थेच्या भूमीवर लागवड करण्यात आली. उन्हाळ्यात तब्बल ४५ ते ४६ अंशावर जाणाऱ्या तापमानात या प्रजाती टिकाव धरणार की नाही हे मुख्य आव्हान संस्थेसमोर होते. मात्र तीन वर्षाचे संशोधन व मशागतीनंतर प्राथमिक स्तरात वाढलेल्या झाडांवर यावर्षी फुले आणि फळे यायला सुरुवात झाली आहे. नव्याने विकसित केलेल्या या प्रजातींमध्ये मुख्यत्वे हॅमलीन, पेरा, नटाल, व्हॅलेन्शिया आणि वेस्टीन यांचा समावेश आहे. या प्रजातींमध्ये गोडवा तर आहेच, मात्र सोबत भरपूर रस देण्याची क्षमताही आहे. यातील नटाल ही प्रजाती सर्वाधिक लाभदायक असल्याचा दावा डॉ. लदानिया यांनी केला. यामध्ये ४० ते ४५ टक्के रस देण्याची क्षमता आणि अधिक गोडपणा असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रजातींसाठी जळगावच्या जैन इरिगेशन सिस्टीम या कंपनीशी करार करण्यात आला असून त्यांनी लागवड आणि शेतकऱ्यांना वितरण सुरू केल्याचे स्पष्ट केले. याशिवाय संस्थेने पंजाबमधील काही मोसंबीच्या प्रजाती विदर्भाच्या वातावरणात विकसित केल्या आहेत. यामध्ये ब्लड रेड, पाईनॅप्पल आणि जाफा यांचा समावेश आहे. या मोसंबीचे झाड संस्थेमध्ये प्राथमिक स्तरात वाढले असून ६० ते ७० फळे देत आहेत. झाड वाढल्यानंतर फळांची संख्या ५०० च्यावर जात असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रजाती सुद्धा रसदार असून प्रक्रिया उद्योगासाठी लाभदायक आहेत. यासोबतच संस्थेने अमेरिकेमध्ये लोकप्रिय असलेल्या ग्रॅप फ्रू टच्या स्टार रुबी, रेड ब्लश, मार्श सीडलेस आदी प्रजाती विकसित केल्या आहेत. या सर्व प्रजातींवर आणखी दोन ते तीन वर्ष निरीक्षणात ठेवण्यात येणार असून त्यानंतर शेतकऱ्यांना वितरित करण्यात येतील.विदर्भात उपलब्ध असलेल्या प्रजाती प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टीने मागे असून या नवीन प्रजाती शेतकऱ्यांना आणि उद्योजकांनाही लाभदायक ठरतील, असा दावा त्यांनी केला. यावेळी संस्थेचे वैज्ञानिक डॉ. सोनकर, डॉ. हुच्छे आदी उपस्थित होते.

लिंबूच्या नवीन प्रजातींचेही संशोधनसंस्थेने संत्र्यासोबतच लिंबू फळांच्या इतर राज्यातील प्रजातींना विदर्भातील उष्ण वातावरणानुसार विकसित केले आहे. यामध्ये ‘आसाम लेमन’, ‘पंत लेमन’यांचा समावेश आहे. याशिवाय संस्थेने संशोधित केलेले ‘बारमासी लेमन’ हे विशेष आहे. बाराही महिने फळे देणारी ही प्रजाती शेतकऱ्यांना लाभदायक ठरेल. विशेष म्हणजे यामध्ये रसाची क्षमता पारंपरिक प्रजातींपेक्षा दुपटीने अधिक आहे. या प्रजाती विशिष्ट तंत्राने रोगमुक्त करण्यात आल्या असून अधिक रसदार आणि अधिक काळ टिकू शकतील अशा पद्धतीने विकसित केल्याचे डॉ. लदानिया यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :agricultureशेती