‌भोसकाभोसकीत दोघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:26 IST2020-12-04T04:26:02+5:302020-12-04T04:26:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तरुणीला शिवीगाळ केल्याच्या वादातून दोघांनी एकमेकांवर चाकूहल्ला चढवून भोसकल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. एमआयडीसी ...

Both seriously injured in Bhosakabhoski | ‌भोसकाभोसकीत दोघे गंभीर जखमी

‌भोसकाभोसकीत दोघे गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तरुणीला शिवीगाळ केल्याच्या वादातून दोघांनी एकमेकांवर चाकूहल्ला चढवून भोसकल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री ८ ते ८.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली.

निखिल शेषराव सोनवणे (वय २६) आणि रोशन उईके (वय २२) अशी आरोपींची नावे असून त्यांनी एकमेकांविरुद्ध पोलिसांकडे तक्रारीही दाखल केल्या आहेत. निखिल शेषराव सोनवणे याने दिलेल्या तक्रारीनुसार, तो आणि संतोष हे दोघे बुधवारी रात्री वानाडोंगरीतील रक्षकनगरात आले असताना आरोपी रोशन संतोषच्या मेव्हणीला शिवीगाळ करताना दिसला. त्याला हटकले असता त्याने चाकूने हल्ला चढवून निखिलला चाकू तसेच काचेच्या बाॅटलने भोसकले. तर, रोशनच्या तक्रारीनुसार, आरोपी संतोष खडेकरने त्याला चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. दोघांनीही पोलिसांना दिलेल्या परस्परविरोधी बयाणवजा तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी आरोपी रोशन आणि संतोषविरुद्ध गुन्हे दाखल केले.

----

Web Title: Both seriously injured in Bhosakabhoski

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.