शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

बॉम्बस्फोटाचा आरोपी गनीचा मृतदेह मुंबईला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:46 IST

१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेचा सिद्धदोष आरोपी अब्दुल गनी इस्माईल तुर्क (वय ६८) याचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याचा मुलगा आणि पुतण्या मुंबईला शुक्रवारी रात्री रवाना झाले.

ठळक मुद्देमुलगा आणि पुतण्याने घेतला ताबा : मेडिकलमध्ये शवविच्छेदनास विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेचा सिद्धदोष आरोपी अब्दुल गनी इस्माईल तुर्क (वय ६८) याचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याचा मुलगा आणि पुतण्या मुंबईला शुक्रवारी रात्री रवाना झाले. वृद्धत्व आणि विविध आजाराने ग्रासलेल्या गनीचा गुरुवारी दुपारी येथील मेडिकल रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूचे वृत्त कारागृह प्रशासनाकडून कळताच गनीचा मुलगा अशरफ अब्दुल गनी तुर्क आणि पुतण्या गुलाम रसूल तुर्क गुरुवारी रात्री ८ वाजता नागपुरात पोहचले. त्यांनी त्याचवेळी अधिकाऱ्यांशी बोलून गनीचा मृतदेह विमानाने मुंबईला नेणार असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले होते.१२ मार्च १९९३ ला मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या आरोपात गनीला अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर तपास यंत्रणांकडे गनीने आरडीएक्स पेरून मुंबईतील सेंच्युरी बाजारात बॉम्बस्फोट घडवून आणल्याची कबुली दिली होती. स्फोट कसे घडवून आणले, कट कुठे आणि कसा रचला, त्याचीही माहिती त्याने तपास यंत्रणेकडे दिली होती. या स्फोटात ११३ लोकांचा मृत्यू झाला होता. गनीचा केवळ याच स्फोटात नव्हे तर मुंबईत ठिकठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या कटातही सहभाग असल्याचे सांगितले जात होते. पाकिस्तानच्या मदतीने या स्फोटाचे कटकारस्थान रचणारा दाऊद इब्राहिम हा त्यावेळी पळून गेला होता. तर, गनीसोबत नंतर क्रमश: याकूब मेमन आणि अन्य काही जणांनाही पोलिसांनी अटक केली होती. चौकशीनंतर गनीला येरवडा कारागृहात डांबण्यात आले होते. तेथून नोव्हेंबर २०१२ ला त्याला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले होते. तेव्हापासून तो नागपूर मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भोगत होता. याकूबला या स्फोटाच्या आरोपात नागपूर कारागृहात फाशी देण्यात आली होती. गनीसोबत फाशी तसेच नंतर आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावलेल्या अनेक आरोपींना नागपूरच्या कारागृहात बंदिस्त करण्यात आले होते. गेल्या वर्षीपासून गनीला विविध आजाराने ग्रासले होते. त्याला पॅरालिसिसही झाला होता. त्यामुळे त्याची प्रकृती ढासळतच चालली होती. २२ एप्रिलला त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथून सुटी मिळाल्यानंतर कारागृहातील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी (२५ एप्रिल) दुपारी ११.४० ला त्याची प्रकृती ढासळली.तो बेशुद्ध पडल्यामुळे त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. त्याच्या मृत्यूचे वृत्त कारागृह प्रशासनाने गृह मंत्रालय, कारागृह तसेच पोलीस प्रशासनातील वरिष्ठांना आणि गनीच्या नातेवाईकांनाही कळविले. त्यानुसार, गनीचा मुलगा अशरफ अब्दुल गनी तुर्क आणि पुतण्या गुलाम रसूल तुर्क गुरुवारी रात्री ८ वाजता नागपुरात पोहचले. आज सकाळी त्यांनी धंतोली पोलीस ठाणे गाठून आपली ओळख दाखविली. गनीचा मृतदेह मुंबईला विमानाने नेणार असल्याचेही सांगितले होते.सुरक्षा यंत्रणा सतर्कधंतोलीचे ठाणेदार प्रसाद सानप आणि पीएसआय राठोड यांनी आवश्यक ती कागदपत्रे तयार करून दुपारी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मेडिकलमध्ये गनीचे शवविच्छेदन करून घेतले. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे तयार करून अशरफ आणि गुलामच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला. यात रात्रीचे ७ वाजले. त्यानंतर मोठ्या पोलीस ताफ्याच्या गराड्यात गनीचा मृतदेह विमानतळाकडे आणि तेथून तो मुंबईला रवाना करण्यात आला. प्रकरण मुंबई बॉम्बस्फोटाच्या आरोपीशी संबंधित असल्यामुळे गुरुवारी दुपारपासूनच शहर पोलीस दल, दहशतवादविरोधी पथकासह सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. गनीचा मृतदेह मुंबईला रवाना होईस्तोवर सुरक्षा यंत्रणांवर एक अनामिक दडपण होते.

टॅग्स :terroristदहशतवादीMumbaiमुंबईBlastस्फोटDeathमृत्यू