शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
2
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
3
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
4
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
5
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
6
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
7
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
8
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
9
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
11
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
12
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
13
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
14
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
15
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
16
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

नागपुरात गायकांनी घडवली रसिकांना बॉलिवूड रेट्रो युगाची सफर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 10:52 PM

पावसाळी मौसम आणि त्यात हिंदी चित्रपटातील, त्यातही जुन्या काळातील अर्थात रेट्रो जमान्यातील बॉलिवूड गाणी, म्हणजे एक अद्भूत संगम. या संगमाची सफर आज डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात नागपूरकर रसिकांनी अनुभवली.

ठळक मुद्दे ‘दर्दे दिल’ गाण्यानी रसिक मंत्रमुग्ध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळी मौसम आणि त्यात हिंदी चित्रपटातील, त्यातही जुन्या काळातील अर्थात रेट्रो जमान्यातील बॉलिवूड गाणी, म्हणजे एक अद्भूत संगम. या संगमाची सफर आज डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात नागपूरकर रसिकांनी अनुभवली.स्वरवेध आणि स्वरतरंग म्युझिक अकादमीच्यावतीने प्रसिद्ध युवा गायक निरंजन बोबडे व अ‍ॅड. भानूदास कुळकर्णी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या ‘हिट्स ऑफ मोहम्मद रफी आणि किशोर कुमार’ या कार्यक्रमाचे आयोजन देशपांडे सभागृहात करण्यात आले होते. हा कार्यक्रम आणि बऱ्याच कालावधीनंतर निर्माण झालेल्या पावसाळी झळा, असा संयोग शनिवारी जुळून आला होता. त्यात निरंजन बोबडेसह पार्वथी नायर, अमीत गणवीर, राधिका देशपांडे व नंदू अंधारे यांच्या सुरेल स्वरांतून मो. रफी व किशोर कुमार यांची गाजलेली गाणी सादर केली. उपस्थित रसिकांनी ही गाणी उचलून धरली आणि सुहाना मोसमात दर्दे दिल गाण्यांचा आनंद लुटला. निसार खान यांच्या निवेदनाने प्रत्येक गाणे आणि त्या गाण्यांचा संदर्भ उलगडून दाखवताना, रसिकांना गीत निर्मितीच्या प्रवासात नेण्याची किमया साधली. यावेळी, मन तडपत हरी दर्शन.. तेरे बिना जिंदगी से कोई, दर्दे दिल, मोहब्बत जिंदा रहती है.. वो श्याम कुछ अजिब थी.. कुहू कुहू बोले कोयलिया.. नैन मिलाके चैन चुराया.. अकेले है चले आओ.. पग घुंगरू बांध.. एक मैं और एक तू.. सुहानी रात... दिन ढल जाए.. खिलते है गुल यहाँ, पायलवाली देख ना.. मधुबन मे राधिका.. दो सितारो का जमी पर.. सलामें इश्क मेरी.. दिल जो ना कह सका.. उडे जब जब जुल्फे.. इंतेहा हो गई इंतजार की.. आ लगजा गले.. तू गंगा की... नाचे मन मोरा.. ही गाणी सादर करण्यात आली. गायकांना कीबोर्डवर महेंद्र ढोले, परिमल जोशी, गिटार प्रसन्ना वानखेडे,कांगो व ढोलक वर दीपक कांबळे, ड्रमवर सुभाष वानखेडे, तबल्यावर पंकज यादव आणि अ‍ॅड. भानुदास कुळकर्णी यांनी साथसंगत केली.

टॅग्स :musicसंगीतMohammed Rafiमोहम्मद रफीnagpurनागपूर