नागपुरात बोलेरोच्या धडकेत सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 20:57 IST2021-05-28T20:56:48+5:302021-05-28T20:57:15+5:30
Accident , social worker death रस्ता ओलांडत असलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याला भरधाव बोलेरो चालकाने जोरदार धडक दिली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास वर्धा मार्गावरील स्वामी विवेकानंद हॉस्पिटल समोर हा भीषण अपघात घडला.

नागपुरात बोलेरोच्या धडकेत सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्ता ओलांडत असलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याला भरधाव बोलेरो चालकाने जोरदार धडक दिली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास वर्धा मार्गावरील स्वामी विवेकानंद हॉस्पिटल समोर हा भीषण अपघात घडला.
संजय सदाशिव पारधी (वय ४२) असे मृतकाचे नाव असून ते तुमसर (जि. भंडारा) जवळच्या मोहगाव खदान येथील रहिवासी होते. पारधी सामाजिक कार्यकर्ते होते. नेहमीच ते कोणत्याही रुग्णाला उपचारासाठी मदत करायचे. त्यामुळे एम्स सह अन्य रूग्णालयांमध्ये त्यांची ओळख होती. पारधी गुरुवारी सीताबर्डी आले. तेथून ते बसने पांजरी बसथांब्याजवळ उतरले. रस्ता ओलांडत असताना विवेकानंद हॉस्पिटलसमोर त्यांना एका काळ्या रंगाच्या बोलेरो चालकाने जोरदार धडक मारली. त्यामुळे पारधी यांचा त्यात मृत्यू झाला. सचिन मधुकर भैरम यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी अपघाताची नोंद केली. आरोपी वाहन चालकाचा शोध घेतला जात आहे.