नितीन गडकरींच्या फार्महाऊसवर बॉयलरचा स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 14:07 IST2018-05-23T14:06:52+5:302018-05-23T14:07:06+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या धापेवाडा (ता.कळमेश्वर) येथील फार्महाऊसवर बॉयलरचा स्फोट झाल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुुमारास घडली. पद्माकर श्रीराव (४५) रा. धापेवाडा असे मृताचे नाव आहे.

नितीन गडकरींच्या फार्महाऊसवर बॉयलरचा स्फोट
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या धापेवाडा (ता.कळमेश्वर) येथील फार्महाऊसवर बॉयलरचा स्फोट झाल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुुमारास घडली. पद्माकर श्रीराव (४५) रा. धापेवाडा असे मृताचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धापेवाडा येथील कांचन इंडिया या सौंदर्य प्रसाधन कंपनीच्या बॉयलरमध्ये हा स्फोट झाला. ही कंपनी गडकरी यांच्या पत्नी कांचनताई यांच्या मालकीची आहे. या कंपनीसाठी लागणारे आवश्यक उत्पादन त्यांच्या फार्महाऊस परिसरात घेतले जाते. त्याच परिसरात हळदी उकळण्यासाठी एक बॉयलर आहे. तिथे अनेक कामगार काम करतात. मंगळवारी सायंकाळी अचानक बॉयलरचा स्फोट झाला. यामुळे बॉयलरमध्ये हळद उकळण्यासाठी असलेले गरम पाणी कामगाराच्या अंगावर आले आणि त्यात भाजलेल्या पद्माकर श्रीराव या कामगाराचा उपचारापूर्वीच मंगळवारी रात्री मृत्यू झाला. या प्रकरणी तपास सुरु असल्याची माहिती कळमेश्वर पोलिसांनी दिली.