नागपुरात तोतया पोलिसांनी महिलेला फसविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 23:12 IST2018-06-13T23:12:43+5:302018-06-13T23:12:58+5:30
नंदनवन ठाण्यांतर्गत दुचाकीने जात असलेल्या महिलेला दोन तोतया पोलिसांनी गाडी तपासण्याच्या बहाण्याने लुटले. दुचाकीसह ४५ हजारांची रोख लंपास केली, ही घटना मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी रंजना रमेश नगराळे (४०) रा. नंदनवन झोपडपट्टी यांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नागपुरात तोतया पोलिसांनी महिलेला फसविले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नंदनवन ठाण्यांतर्गत दुचाकीने जात असलेल्या महिलेला दोन तोतया पोलिसांनी गाडी तपासण्याच्या बहाण्याने लुटले. दुचाकीसह ४५ हजारांची रोख लंपास केली, ही घटना मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी रंजना रमेश नगराळे (४०) रा. नंदनवन झोपडपट्टी यांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी २.३० च्या दरम्यान नगराळे या त्यांच्या एमएच-३१/ईबी-४७५८ क्रमांकाच्या दुचाकीने आईला भेटण्यास निघाल्या होत्या. नंदनवन परिसरातील दिघोरी पुलाजवळील रिंगरोडवर २५ ते ३० वयोगटातील दोन भामट्यांनी नगराळे यांना रस्त्यात रोखले. त्यांनी आपण पोलीस असून तुमच्या गाडीचे कागदपत्र दाखवा, अशी बतावणी केली. गाडीचे कागदपत्र तपासण्याच्या बहाण्याने त्या तोतयांनी नजर चुकवून नगराळे यांच्या गाडीच्या डिक्कीत असलेली ४५ हजारांची रोकड व त्यांची दुचाकी घेऊन पोबारा केला. नगराळे यांनी आरडाओरड केली, मात्र दोन्ही चोरटे पसार झाले. यानंतर नगराळे यांनी नंदनवन ठाणे गाठून चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला. पुढील तपास सुरू आहे.