बोगस प्रमाणपत्र प्रकरण : निवृत्त क्रीडा उपसंचालकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 12:13 AM2020-10-14T00:13:31+5:302020-10-14T00:15:13+5:30

Retired Deputy Director Sports arrested , crime news बोगस क्रीडा प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळविल्या प्रकरणात मानकापूर पोलिसांनी सेनानिवृत्त क्रीडा उपसंचालक व क्रीडा अधिकाऱ्याला अटक केली आहे.

Bogus certificate case: Retired Deputy Director of Sports arrested | बोगस प्रमाणपत्र प्रकरण : निवृत्त क्रीडा उपसंचालकाला अटक

बोगस प्रमाणपत्र प्रकरण : निवृत्त क्रीडा उपसंचालकाला अटक

Next
ठळक मुद्देमानकापूर पोलिसांची कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : बोगस क्रीडा प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळविल्या प्रकरणात मानकापूर पोलिसांनी सेनानिवृत्त क्रीडा उपसंचालक व क्रीडा अधिकाऱ्याला अटक केली आहे. आरोपींमध्ये सुभाष रेवतकर (६०) व महेश पडोळे (५२) भंडारा यांचा समावेश आहे.
मानकापूर पोलिसात १९ सप्टेंबरला गुन्हा दाखल झाला होता. क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोगस प्रमाणपत्र बनवून दिल्याने अनेकांनी सरकारी नोकरी मिळविली होती. हे प्रमाणपत्र वेगवेगळ्या खेळांसाठी दिले होते. पश्चिम महाराष्ट्रातील एका युवकाने नागपूर येथील क्रीडा उपसंचालक कार्यालयाकडून बोगस प्रमाणपत्र मिळविले होते. या प्रकरणाच्या चौकशीत घोटाळा झाल्याचा खुलासा झाला. मानकापूर पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला होता. पोलिसांनी रत्नागिरी येथील क्रीडा अधिकारी सुभाष सावंत व त्याच्या भावाला अटक केली होती. त्याच्या भावाची क्रीडा कोट्यातून पीएसआयसाठी निवड झाली होती.
प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना सेवानिवृत्त उपसंचालक सुभाष रेवतकर व क्रीडा अधिकारी महेश पडोळे हे प्रकरणात गुंतले असल्याची माहिती मिळाली. आज दोघांनाही अटक करण्यात आली. रेवतकर नागपुरात कार्यरत असताना त्यांच्या काळात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. ते नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्याचप्रकारे पडोळेसुद्धा नागपुरातच कार्यरत होते. सध्या ते भंडारा येथे कार्यरत आहेत. बुधवारी दोघांना न्यायालयात सादर करून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जाईल.

Web Title: Bogus certificate case: Retired Deputy Director of Sports arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.