शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
3
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
4
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
5
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
6
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
7
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
8
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
9
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
10
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
11
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
12
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
13
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
14
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
15
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
16
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
17
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
18
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
19
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
20
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा

 बोगस बिलाचा ११५ कोटींचा घोटाळा उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 8:32 PM

वस्तूंच्या विक्रीसाठी बोगस बिल जारी करणे आणि त्याआधारे जीएसटीचा परतावा घेण्याप्रकरणी जीएसटी गुप्तचर संचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर युनिटच्या अधिकाऱ्यांनी १२ फेब्रुवारीला नागपुरातील राजा सिमेंट हाऊसचे संचालक राजा अशोक अग्रवाल याला अटक केली.

ठळक मुद्देडीजीजीआय नागपूर युनिटची कारवाई : फर्मच्या संचालकाला अटक

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : वस्तूंच्या विक्रीसाठी बोगस बिल जारी करणे आणि त्याआधारे जीएसटीचा परतावा घेण्याप्रकरणी जीएसटी गुप्तचर संचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर युनिटच्या अधिकाऱ्यांनी १२ फेब्रुवारीला नागपुरातील राजा सिमेंट हाऊसचे संचालक राजा अशोक अग्रवाल याला अटक करून १३ फेब्रुवारीला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले .प्राप्त माहितीच्या आधारे डीजीजीआयच्या नागपूर युनिटच्या अधिकाऱ्यांनी राजा अग्रवाल यांच्याकडे नोंद असलेल्या लुधियाना व नागपूर येथील अनेक करदात्यांच्या ठिकाणांवर एकाच वेळी धाडी टाकल्या. या धाडीत लुधियाना व नागपूर येथे नमूद करदाते अस्तित्वात नव्हते. नागपुरातील बिडगाव रोड, मंगल बाजार चौक येथील राजा सिमेंट हाऊसचे संचालक राजा अग्रवाल यांनी सर्व वस्तूंची विक्री कागदपत्रांवर केल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. अग्रवालने वस्तूंचा प्रत्यक्ष पुरवठा न करता केवळ बनावट पावत्या तयार केल्या होत्या.राजा अग्रवालने ११५ कोटींपेक्षा जास्त किमतीच्या बनावट पावत्या एकत्रितपणे स्वीकारून जारी केल्या. या बनावट पावत्यांच्या आधारे जीएसटी विभागाकडून १०.४४ कोटींच्या फसव्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतल्याचे अधिकाऱ्यांना तपासणीत आढळून आले. राजा अग्रवालने बोगस पावत्या स्वीकारणे आणि देणे तसेच त्या आधारे जीएसटी विभागाकडून इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविण्याची कबुली दिली. त्याआधारे अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली.

टॅग्स :GSTजीएसटीraidधाड