शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात जाकीरचा मृतदेह आढळला

By admin | Updated: June 29, 2014 00:42 IST

कुख्यात गुन्हेगार जाकीर ऊर्फ बशिर पठाण (वय ४५) याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने गुन्हेगारी जगतात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. त्याचा मृत्यू घातपाताचा प्रकार असल्याचे बोलले जाते.

घातपाताचा संशय : गुन्हेगारी जगतात उलटसुलट चर्चानागपूर : कुख्यात गुन्हेगार जाकीर ऊर्फ बशिर पठाण (वय ४५) याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने गुन्हेगारी जगतात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. त्याचा मृत्यू घातपाताचा प्रकार असल्याचे बोलले जाते. मात्र, ज्या खोलीत जाकीर मृतावस्थेत आढळला, त्या खोलीचे समोरचे दार आणि मागच्या गॅलरीचे दारही आतून कडी लावून बंद असल्याने पोलीस घातपाताचा इन्कार करीत आहेत.जाकीर पठाणचा गुन्हेगारी जगतात मोठा दबदबा आहे. अजनी, नंदनवन, कोतवाली आणि अन्य पोलीस ठाण्यात त्याच्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. शहरातील एका भाईचा ‘राईट हॅण्ड‘ म्हणूनही त्याची ओळख आहे. प्राणघातक हल्ले, खंडणी वसुली, अपहरण असे गुन्हे तो वारंवार करीत असल्याने परिमंडळ चारचे उपायुक्त चंद्रकिशोर मिना यांनी त्याला काही दिवसांपूर्वीच हद्दपार केले होते. मात्र, कुख्यात जाकीर नागपुरातच मुक्कामी होता. नंदनवनमधील व्यंकटेशनगरात एनआयटीने बांधलेल्या घरकुलातील डी विंगमधील दुसऱ्या माळ्यावर २१४ क्रमांकाची सदनिका त्याने भाड्याने घेतली होती. तीन महिन्यांपासून तेथे राहात होता. त्याला दोन बायका असल्याचे पोलीस सांगतात. आज सायंकाळी इमारतीतील मुले बाजूला खेळत असताना त्यांना तीव्र दुर्गंध आला. त्यांनी ते नागरिकांना सांगितले. त्यानंतर ही माहिती नंदनवन पोलिसांना कळली. (प्रतिनिधी)