शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

नागपूरनजीक हिंगणा भागातील तलावात बुडालेल्या तरुणांचे मृतदेह काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 22:23 IST

रविवारी सायंकाळी हिंगणा तालुक्यातील सालईमेंढा शिवारातील तलावात बुडून मरण पावलेल्या तरुणांचे मृतदेह अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी सोमवारी बाहेर काढले. त्यानंतर त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ठळक मुद्देअग्निशमन दलाची मदत : शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रविवारी सायंकाळी हिंगणा तालुक्यातील सालईमेंढा शिवारातील तलावात बुडून मरण पावलेल्या तरुणांचे मृतदेह अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी सोमवारी बाहेर काढले. त्यानंतर त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.प्रथमेश ऊर्फ गुड्डू सिद्धांत सिडाम (१७, रा. भांडेप्लॉट, उमरेड रोड, नागपूर), सागर सुरेश जांबुळकर (१८, रा. भांडेप्लॉट, सेवादलनगर, नागपूर) आणि बंटी प्रेमलाल निर्मल (१४, रा. भांडेप्लॉट, उमरेड रोड नागपूर) आणि आणखी पाच युवक ‘फ्रेंडशीप डे’च्या निमित्ताने सालईमेंढा परिसरात पिकनिकसाठी गेले होते. तलावाच्या काठावर गेल्यानंतर सिडाम, जांबुळकर आणि निर्मल या तिघांना पोहण्याचा मोह अनावर झाला आणि तेथेच त्यांचा घात झाला. या तिघांचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी ही करुणाजनक घटना घडली. त्याचे वृत्त नागपुरात कळताच खळबळ निर्माण झाली.माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. स्थानिक तरुणांच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आले. सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास प्रथमेशचा मृतदेह सापडला. नंतर अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले. सोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. यावेळी तलावाच्या काठावर मृताचे नातेवाईक, नगरसेवक नागेश सहारे, एसीपी सिद्धार्थ शिंदे, ठाणेदार मोरेश्वर बारापात्रे, पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, उपनिरीक्षक विनायक जाधव, अनिल धानोरकर, रवींद्र नेतनराव, कमलेश साहूआणि भांडेप्लॉट वस्तीतील तरुण मोठ्या संख्येत जमले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास सागरचा आणि दुपारी १ वाजताच्या सुमारास बंटीचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी प्रक्रिया आटोपल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. तेथून ते मृताच्या नातेवाईकांनी भांडेप्लॉट परिसरात आणले. यावेळी नातेवाईकांचा आक्रोश तीव्र झाला होता. वस्तीतील तीन युवकांचा अशा पद्धतीने जीव गेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात होती. सिडामवर जरीपटक्यातील कब्रस्तानात तर जांबुळकर आणि निर्मलवर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.शासकीय मदतीची मागणीसिडाम, जांबुळकर आणि निर्मल या तिघांच्याही घरची स्थिती अत्यंत हलाखीची आहे. मुले शिकून मोठी होतील आणि आर्थिक स्थिती सुधारेल, अशा आशेवर असलेल्या पालकांना या घटनेमुळे जबर मानसिक धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार सुधाकर कोहळे यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. नगरसेवक नागेश सहारे यांनी मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देऊन त्यांना दिलासा देण्याची मागणी यावेळी केली. 

 

टॅग्स :Studentविद्यार्थीDeathमृत्यू