बाेर्डाकडून काॅपी झालेल्या केंद्रातील सहा शिक्षकांच्या निलंबनाची शिफारस

By निशांत वानखेडे | Updated: February 22, 2025 18:56 IST2025-02-22T18:53:09+5:302025-02-22T18:56:34+5:30

काॅपी झालेल्या केंद्रातील शिक्षक : विद्यार्थ्यांवर कारवाई चाैकशीनंतरच

Board recommends suspension of six teachers from copied center | बाेर्डाकडून काॅपी झालेल्या केंद्रातील सहा शिक्षकांच्या निलंबनाची शिफारस

Board recommends suspension of six teachers from copied center

नागपूर : राज्य मंडळाच्या दहावी, बारावी परीक्षेदरम्यान यंत्रणा अलर्ट माेडवर असताना विभागातील काही केंद्रांवर काॅपीचे प्रकरणे समाेर आली. आता याविराेधात कठाेर कारवाईसाठी बाेर्डाने हालचाली वाढविल्या आहेत. ज्या केंद्रांवर काॅपी झाली, तेथील ६ शिक्षकांना निलंबित करण्याची शिफारस बाेर्डाने केली आहे.

दाेन्ही परीक्षांसाठी बाेर्डच नाही तर संपूर्ण प्रशासन अलर्ट माेडवर आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांनीही कठाेर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे काॅपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी बाेर्ड, शिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन व पाेलीस प्रशासनही सक्रिय आहे. प्रत्येक स्तरावर भरारी पथके तैनात केली आहेत. असे असताना काही केंद्रावर काॅपीचे प्रकरण घडली. ज्या केंद्रावर काॅपीचे प्रकार घडले, त्या केंद्रांच्या ६ शिक्षकांना निलंबित करण्याची शिफारस केल्याची माहिती विभागीय अध्यक्ष चिंतामण वंजारी यांनी दिली. यामध्ये वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपुर जिल्ह्यातील शिक्षकांचा समावेश आहे. या ६ शिक्षकांना निलंबित करण्याची शिफारस बाेर्डाने संबंधित जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी यांना केल्याची माहिती वंजारी यांनी दिली.

गणिताच्या पेपरला ६ विद्यार्थ्यांना पकडले
बाेर्ड व प्रशासनाने काॅपीमुक्त परीक्षा अभियानासाठी प्रयत्न चालविले आहेत. मात्र काॅपीची प्रकरणे शनिवारीही समाेर आली. गणिताचा पेपर हाेता व हा पेपर अनेकांसाठी त्रास देणारा असताे. त्यामुळे विद्यार्थी गैरमार्गाचा वापर करतात. अशा ६ विद्यार्थ्यांना शनिवारी पकडण्यात आले. यामध्ये भंडारा व गाेंदियाचे प्रत्येकी एक आणि गडचिराेली जिल्ह्यातील ४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान आजच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेली मूळ उत्तरपत्रिका जप्त करून नवीन देण्यात आली. या विद्यार्थ्यांनी केलेल्या गैरप्रकारात किती गंभीरता हाेती, याची चाैकशी करून कारवाई केली जाईल. कदाचित त्यांना एक किंवा दाेन परीक्षेवर बंदी घालण्यात येण्याची शक्यता बाेर्डाने स्पष्ट केली आहे.

Web Title: Board recommends suspension of six teachers from copied center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.