बोर्डाच्या परीक्षेमुळे निवडणुकीच्या कामातून मिळणार मुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:00 IST2019-02-09T23:59:53+5:302019-02-10T00:00:47+5:30

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षेच्या कामात व्यस्त असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या कामातून मुक्त केले आहे. यासंदर्भात अप्पर मुख्य सचिव वंदना कृ ष्णा यांनी सर्व जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र पाठविले आहे. या पत्रात परीक्षेचे काम करणाऱ्या शिक्षकांचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे शिक्षकांना दोन्ही कामे करावी लागणार आहे.

Board exams will get rid of election work | बोर्डाच्या परीक्षेमुळे निवडणुकीच्या कामातून मिळणार मुक्ती

बोर्डाच्या परीक्षेमुळे निवडणुकीच्या कामातून मिळणार मुक्ती

ठळक मुद्देसर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सूट, शिक्षकांना नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षेच्या कामात व्यस्त असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या कामातून मुक्त केले आहे. यासंदर्भात अप्पर मुख्य सचिव वंदना कृ ष्णा यांनी सर्व जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र पाठविले आहे. या पत्रात परीक्षेचे काम करणाऱ्या शिक्षकांचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे शिक्षकांना दोन्ही कामे करावी लागणार आहे.
वंदना कृष्णा यांनी पाठविलेल्या पत्रामध्ये बोर्डाच्या दहावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. १ मार्चपासून सुरू होणाऱ्या लेखी परीक्षा २२ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. बारावीच्या पॅ्रक्टिकल परीक्षा १८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. २१ फेब्रुवारीपासून लेखी परीक्षा सुरू होणार असून, २० मार्चपर्यंत चालणार आहे. परीक्षेचे कार्य संवेदनशील आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार परीक्षेनंतर बोर्डाला १० जूनपर्यंत निकाल घोषित करायचा आहे. त्यामुळे परीक्षेचे काम महत्त्वाचे आहे. सध्या बोर्डाकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. हे लक्षात घेता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्य शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या कामातून मुक्तता केली आहे.
काही दिवसांपूर्वी नागपूर विभागीय कार्यालयाला निवडणुकीच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठविले होते. निवडणुकीच्या कामासाठी बोर्डातून कर्मचाऱ्यांना पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. परीक्षेचा कालावधी लक्षात घेता बोर्डाच्या विभागीय अधिकाऱ्यांनी मंडळाच्या मुख्यालयाला पत्र पाठविले होते. बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याची विनंती केली होती. बोर्डाच्या पत्रानंतर शिक्षण विभागाने राज्य सरकारकडे यासंदर्भात विनंती केली.
 शिक्षकांना करावेच लागेल दोन्ही काम
कृष्णा यांन पत्रात केवळ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाच अधोरेखित केले आहे. यात शिक्षकांचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे शिक्षकांना कुठलीही सवलत मिळणार नाही. त्यांना परीक्षेसोबतच निवडणुकीचे कार्य करावे लागणार आहे.

Web Title: Board exams will get rid of election work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.