‘टेंडर निघालं निळ्या झेंड्याच्या विक्रीचं’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 23:57 IST2018-02-08T23:55:38+5:302018-02-08T23:57:13+5:30

कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना एका जातीपुरते मर्यादित करून ठेवले. निवडणूक जवळ आली की राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना, भाजपा रिपाइंच्या गटातटांची साथ घेऊन आपली राजकीय पोळी कशी शेकून घेतात, याचे वास्तव संगीत राष्ट्रीय प्रबोधनकार अनिरुद्ध वनकर यांनी आंबेडकरांना स्वार्थासाठी राजकीय भांडवल बनविणाऱ्या पक्षांवर आपल्या गीताद्वारे जोरदार प्रहार केला.

'Blue flag sells to tender' | ‘टेंडर निघालं निळ्या झेंड्याच्या विक्रीचं’

‘टेंडर निघालं निळ्या झेंड्याच्या विक्रीचं’

ठळक मुद्दे‘मी वादळवारा’ : अनिरुद्ध वनकरांच्या प्रबोधनपर गीतांनी रसिकांमध्ये जोश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना एका जातीपुरते मर्यादित करून ठेवले. निवडणूक जवळ आली की राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना, भाजपा रिपाइंच्या गटातटांची साथ घेऊन आपली राजकीय पोळी कशी शेकून घेतात, याचे वास्तव संगीत राष्ट्रीय प्रबोधनकार अनिरुद्ध वनकर यांनी आंबेडकरांना स्वार्थासाठी राजकीय भांडवल बनविणाऱ्या पक्षांवर आपल्या गीताद्वारे जोरदार प्रहार केला.
प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने त्यागमूर्ती रमाई महोत्सवाच्यावतीने भगवाननगर येथील पोस्ट आॅफिस मैदानावर ‘मी वादळवारा’ या राष्ट्रीय प्रबोधनकार अनिरुद्ध वनकर यांच्या प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात राष्ट्रीय प्रबोधनकार अनिरुद्ध वनकर यांनी आंबेडकरी जनतेसमोर एकापेक्षा एक प्रबोधनपर गीते सादर करून त्यांचे वैचारिक प्रबोधन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी ‘जगात जोवर असेल पृथ्वी... सूर्य, चंद्र, अंबर...चमचमणारा एकच तारा भीमराव आंबेडकर’ हे गीत सादर करताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करून त्यांना दाद दिली. त्यानंतर ‘भीम कुठं पाहु, भीम कुठं पाहु’ हे गीत त्यांनी सादर केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यागमूर्ती रमाईने साथ दिल्यामुळेच बाबासाहेब समाजासाठी आपले योगदान देऊ शकले. रमाईची महती सांगताना वनकर यांनी ‘कुणाचेच काही इथे कष्ट नाही, तुझीच कमाई आहे गं भीमाई’ हे गीत सादर केले. समाजात सुधारणा घडविण्यासाठी अनेक संतांनी ओव्या, गीतांद्वारे प्रबोधन केले. त्यातील संत कबीर यांचे ‘जत्रा मे फरता बिठाया, तीरथ बनाया पाणी...कबिरा’ हे गीत सादर केले. प्रबोधनाच्या या मैफिलीत त्यांनी ‘भीमा बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर’ अशी एकापेक्षा एक सरस गीते सादर करून उपस्थित रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला. कार्यक्रमात सहगायक देवदत्त सातपुते यांनी ‘शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता.’, सहगायक सुरेश खोब्रागडे यांनी माता रमाई झिजली स्वत:’ ही गीते सादर केली. प्रबोधनपर गीतांच्या या प्रवासात गायकांना ढोलकीवर ईश्वर खोब्रागडे, तबल्यावर आनंद वाकडे, हार्मोनियमवर अनिल डोंगरे, की बोर्डवर लोकेश दुर्गे, आॅक्टोपॅडवर विपीन राऊत यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन मंगेश मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: 'Blue flag sells to tender'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.