शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

हातात ब्लेड, गळ्याला फास, टॉवरवरचे ‘ते’ चार तास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:12 IST

हातात ब्लेड आणि दोर घेऊन तो १५० फूट उंच हायमास्ट लाईटच्या टॉवरवर चढला. शिड्यांना दोराने फास लावून वर बसला. काही क्षणात पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. बघ्यांचीही प्रचंड गर्दी झाली. काही वेळाने अग्निशमन दलही दाखल झाले. तर तो काही जुमानेना. उतरविण्याचा प्रयत्न केला तर त्याने ब्लेडने हाताची नस कापली. जबरदस्ती केली तर गळ्यात लावलेल्या दोराने गळफास घेण्याची धमकी दिली. त्यामुळे पोलिसांचीही भंबेरी उडाली. तब्बल चार तास हे थरारक नाट्य आकाशवाणी चौकात चालले होते आणि श्वास रोखून सगळेच पाहत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हातात ब्लेड आणि दोर घेऊन तो १५० फूट उंच हायमास्ट लाईटच्या टॉवरवर चढला. शिड्यांना दोराने फास लावून वर बसला. काही क्षणात पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. बघ्यांचीही प्रचंड गर्दी झाली. काही वेळाने अग्निशमन दलही दाखल झाले. तर तो काही जुमानेना. उतरविण्याचा प्रयत्न केला तर त्याने ब्लेडने हाताची नस कापली. जबरदस्ती केली तर गळ्यात लावलेल्या दोराने गळफास घेण्याची धमकी दिली. त्यामुळे पोलिसांचीही भंबेरी उडाली. तब्बल चार तास हे थरारक नाट्य आकाशवाणी चौकात चालले होते आणि श्वास रोखून सगळेच पाहत होते.

आकाशवाणी चौकातील हायमास्ट लाईटच्या टॉवरवर चढलेल्या एका तरुणाने शनिवारी चांगलीच खळबळ उडवली. टॉवरवर दारू पिऊन चढलेल्या तरुणाने तेथेच गळ्याला फास लावला होता आणि सोबत नेलेल्या ब्लेडने हाताची नसही कापली असल्याने रक्त वाहत होते. ३८ ते ४० वयोगटातील असलेला हा व्यक्ती कौटुंबिक कारण व कुठल्या तरी कर्जाच्या प्रकरणामुळे आत्महत्येच्या विचाराने चढल्याचे सांगण्यात येत आहे. या तरुणाचे नाव मनोज असल्याचे सांगण्यात येत आहे. तो टॉवरच्याच कंपनीत अभियंता असल्याचे सांगण्यात येत आहे. तो सध्या बेरोजगार झाला होता. सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान आकाशवाणी चौकातील हायमास्ट टॉवरवर तो चढला. लोकांना समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. त्याच्याबाबत माहिती मिळताच जवळपास ७.३० वाजताच्या दरम्यान पोलीस आणि अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पोहचले.टॉवरच्या भोवताल ‘नेट’चौकात टॉवरच्या भोवताली पोलिसांनी गराडा घातला हेता. तो खाली उडी घेईल, या शक्यतेने टॉवरच्या भोवताल नेट लावण्यात आली. दरम्यान, अग्निशमन विभागाकडे असलेल्या उंच टीटीएलच्या मदतीने पोलीस जवान समजविण्यासाठी तरुणापर्यंत पोहचले. त्यावेळी तरुणाने टॉवरच्या शिड्यांना दोर बांधून गळ्यात फास लावून असल्याचे आणि त्याच्या हातात ब्लेड असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्याला पकडायला गेले तेव्हा त्याने स्वत:च्या हातावर ब्लेडने सपासप वार केले. त्यामुळे पोलीस जवानांचीही तारांबळ उडाली. मग त्याची विचारपूस करून समजाविण्याचा प्रयत्न चालला. पथकातील एका जवानाने दिलेल्या माहितीनुसार टॉवरवर चढण्याचे कारण विचारले असता, अनेक कारणाने त्रस्त असल्याचे त्याने सांगितले.त्याने कुठून तरी कर्ज घेतले होते आणि फेडलेही होते. मात्र एका मित्राने त्याची फसवणूक करून आणखी कर्ज मनोजच्या नावावर चढविल्याचे तो सांगत होता. त्याला पत्नी तसेच मुलगा व मुलगी आहे. पण कौटुंबिक कारणाने पत्नी मुलांसह त्याला सोडून गेल्याचेही त्याने सांगितले.

सगळ्यांचीच उडवली भंबेरीपथकाने त्याला समजावून खाली उतरविण्याचा बराच प्रयत्न केला, मात्र त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्यास गळफास घेण्याची धमकी देत असल्याने पोलिसांनी सतर्कता बाळगली होती. जवळपास चार तास हे नाट्य सुरू होते. त्यामुळे पोलीस यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली. रात्री जवळपास १०.३० च्या सुमारास बरेच प्रयत्न करून मनोजला पकडण्यात आणि खाली उतरविण्यात पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. नंतर त्याला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नेण्यात आले.

टॅग्स :nagpurनागपूर