शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

नागपुरात ज्वलनशील पदार्थाचा काळाबाजार  : १३ संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:51 AM

महामार्गावर वाहने लावून गेल्या अनेक वर्षांपासून ज्वलनशील पदार्थाचा (इंधन) काळाबाजार करण्याचा प्रकार पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी आज स्वत:च कारवाई करून बंद पाडला. त्यामुळे या गोरखधंद्यात गुंतलेल्यांचे धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्देपोलीस उपायुक्तांचा छापा :  ८ वाहने जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामार्गावर वाहने लावून गेल्या अनेक वर्षांपासून ज्वलनशील पदार्थाचा (इंधन) काळाबाजार करण्याचा प्रकार पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी आज स्वत:च कारवाई करून बंद पाडला. त्यामुळे या गोरखधंद्यात गुंतलेल्यांचे धाबे दणाणले आहे.पेट्रोल, डिझेल, रॉकेल आणि आॅईलचे टँकर चालकांना पैशाचे आमिष दाखवून तर कधी धाक दाखवून इंधनाची चोरी करण्यास प्रवृत्त केले जाते. महामार्गावर निर्जन ठिकाणी किंवा ढाब्यावर हे इंधन उतरवून त्यात भेसळ केली जाते अन् नंतर त्याचा काळाबाजार केला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून हा गोरखधंदा हिंगणा, बुटीबोरी, सोनेगाव, खापरी आणि उपराजधानीला जोडणाऱ्या  विविध मार्गावर सुरू आहे. या गोरखधंद्यातून रोज लाखोंची कमाई केली जाते. पोलिसांनाही त्यांचा हिस्सा मिळतो, त्यामुळे बिनबोभाट हा धंदा सुरू आहे. त्याची कुणकुण लागताच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी आज दुपारी कारवाईसाठी सापळा लावला. आपल्या निवडक सहकाऱ्यांना सोबत घेत त्यांनी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी नाक्याकडे तीन-चार ठिकाणी छापे मारले. यावेळी त्यांना इंधनाचा काळाबाजार करण्याच्या तयारीत असलेले १३ वाहनचालक आणि संशयित आरोपी आढळले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून आठ ट्रक तसेच दोन टँक जप्त करण्यात आले. काही जण घटनास्थळावरून पळून गेले. या प्रकरणात पोलिसांनी नंतर कारवाईसाठी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनाही सहभागी करून घेतले. वृत्त लिहिस्तोवर नंदनवन ठाण्यात पोलिसांची कारवाई सुरू होती. उपायुक्त भरणे यांच्या या कारवाईमुळे या गोरखधंद्यात गुंतलेल्यांचे तसेच त्यांच्यासोबत संबंध असलेल्यांचे धाबे दणाणले आहे.

टॅग्स :Petrolपेट्रोलCrimeगुन्हा