भाजपचे ‘आदिवासी कार्ड’, नागपुरच्या माजी महापौर माया ईवनाते राज्यसभेच्या उमेदवार

By योगेश पांडे | Updated: March 4, 2026 13:06 IST2026-03-04T13:04:04+5:302026-03-04T13:06:26+5:30

Nagpur : भारतीय जनता पक्षाने राज्यसभा निवडणूकीसाठी उमेदवारी जाहीर करत अनेकांना मोठा धक्का दिला आहे. अनेक जण उमेदवारीसाठी प्रयत्न करत असताना भाजपने मात्र आदिवासी समाजातील असलेल्या नागपुरच्या माजी महापौर माया ईवनाते यांची राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवारी घोषित केली आहे.

BJP's 'tribal card', former Nagpur mayor Maya Evenate is a Rajya Sabha candidate | भाजपचे ‘आदिवासी कार्ड’, नागपुरच्या माजी महापौर माया ईवनाते राज्यसभेच्या उमेदवार

BJP's 'tribal card', former Nagpur mayor Maya Evenate is a Rajya Sabha candidate

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
भारतीय जनता पक्षाने राज्यसभा निवडणूकीसाठी उमेदवारी जाहीर करत अनेकांना मोठा धक्का दिला आहे. अनेक जण उमेदवारीसाठी प्रयत्न करत असताना भाजपने मात्र आदिवासी समाजातील असलेल्या नागपुरच्या माजी महापौर माया ईवनाते यांची राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवारी घोषित केली आहे. ईवनाते यांना उमेदवारी जाहीर करत भाजपने ‘सोशल इंजिनिअरींग’ साधण्यावर भर दिला आहे.

माया ईवनाते या नागपुरच्या माजी महापौर आहेत. त्याचप्रमाणे त्यांना राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या सदस्यपदी काम करण्याचादेखील अनुभव आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महानगरपालिका निवडणूकीत त्यांनी प्रभाग १२ मधून ९ हजार ४०० हून अधिक मताधिक्याने विजय मिळविला होता. मागील आठवड्यातच मनपाच्या अग्निशमन समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. राज्यसभेतून उमेदवारासाठी भाजपकडून मंथन सुरू असताना अचानक दोन दिवसांअगोदर ईवनाते यांना मुंबईला बोलविण्यात आले व तेथे त्यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती देण्यात आली.


 

Web Title : भाजपा का 'आदिवासी कार्ड': माया इवनाते राज्यसभा उम्मीदवार

Web Summary : भाजपा ने नागपुर की पूर्व महापौर माया इवनाते, एक आदिवासी नेता, को राज्यसभा के लिए नामांकित करके चौंका दिया। यह कदम भाजपा के सामाजिक इंजीनियरिंग और आदिवासी पहुंच पर ध्यान केंद्रित करने को दर्शाता है। इवनाते राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोग की सदस्य भी रह चुकी हैं।

Web Title : BJP's 'Tribal Card': Maya Ivnate Nominated for Rajya Sabha

Web Summary : BJP surprises by nominating former Nagpur mayor Maya Ivnate, an Adivasi leader, for Rajya Sabha. This strategic move highlights BJP's focus on social engineering and tribal outreach. Ivnate's experience includes serving on the National Scheduled Tribes Commission.

टॅग्स :nagpurनागपूर