शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

झारखंडचे सरकार पाडण्याचा भाजपचा डाव, प्रभारी अविनाश पांडे यांचा दावा, ८ फेब्रुवारीला राहुल गांधींसोबत आमदारांची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 11:12 IST

Jharkhand News: मध्य प्रदेश गोव्याप्रमाणेच आता झारखंडमधील काँग्रेसप्रणीत सरकार पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत, असा आरोप करीत त्यांचा हा प्रयत्न राजस्थानप्रमाणे यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असा दावा काँग्रेसचे महासचिव व झारखंडचे नवनियुक्त प्रभारी अविनाश पांडे यांनी शुक्रवारी केला.

नागपूर : मध्य प्रदेश गोव्याप्रमाणेच आता झारखंडमधीलकाँग्रेसप्रणीत सरकार पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत, असा आरोप करीत त्यांचा हा प्रयत्न राजस्थानप्रमाणे यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असा दावा काँग्रेसचे महासचिव व झारखंडचे नवनियुक्त प्रभारी अविनाश पांडे यांनी शुक्रवारी केला. याचाच भाग म्हणून झारखंडमधील काँग्रेसच्या १८ आमदारांची ८ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर दौऱ्यादरम्यान पांडे यांनी शुक्रवारी लोकमतला सदिच्छा भेट दिली. यावेळी संपादकीय सहकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. पांडे म्हणाले की, केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून, यंत्रणांचा वापर करून विविध राज्यांमध्ये असलेली काँग्रेसची सरकारे पाडण्याची भाजपची परंपरा राहिली आहे. आता तसे प्रयत्न महाराष्ट्र व झारखंडबाबत होत आहेत.  झारखंडमध्ये याचा सामना करण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून, झारखंड सरकारही ताकदीने काम करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, प्रदेश महासचिव अभिजित सपकाळ, सचिव रवींद्र दरेकर उपस्थित होते.  

चार राज्यांत काँग्रेसचेच सरकार उत्तराखंड, गोवा व मणिपूर या राज्यांमध्ये भाजपला धोबीपछाड देत काँग्रेस सत्तेत येईल. पंजाबमध्ये पुन्हा काँग्रेसचेच सरकार येईल. प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशातही काँग्रेस उल्लेखनीय कामगिरी करेल, असा दावा त्यांनी केला.  काँग्रेसशिवाय पर्याय नाहीकाँग्रेसशिवाय विरोधी पक्ष एकसंध व मजबूत होणे शक्य नाही. विरोधी पक्षाचे नेतृत्व करण्याची इच्छा कुणाचीही असू शकते; मात्र गेल्या सात वर्षात राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने भाजपला घेरले हे प्रशंसनीय आहे, असे त्यांनी ममता बॅनर्जी यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले. प्रादेशिक नेत्यांची नावे पुढे हेतुपुरस्सर विरोधी पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. झारखंडसाठी असे आहे नियोजनnकिमान समान कार्यक्रमांतर्गत सरकार काम करेल.nसंघटन बळकटीसाठी ६० दिवसांचा कार्यक्रम. चिंतन प्रशिक्षण शिबिर होणार.nपक्षाचा प्रत्येक मंत्री दरमहा आठ जिल्ह्यांचा दौरा करेल.n कार्यकर्त्यांना सन्मान देऊन पक्षविस्तार केला जाईल.  

टॅग्स :Avinash Pandeyअविनाश पांडेcongressकाँग्रेसBJPभाजपाJharkhandझारखंड