एससी मतांवर भाजपाचा डोळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 09:23 PM2018-12-29T21:23:28+5:302018-12-29T21:24:52+5:30

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपा सक्रिय झाली आहे. १९ व २० जानेवारी रोजी नागपुरात आयोजित अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीया अधिवेशनाच्या माध्यमातून एससी मतांवर लक्ष केंद्रित करण्याचे नियोजन भाजपाने केले आहे. विशेष म्हणजे २० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता कस्तूरचंद पार्क येथे या अधिवेशनात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हजेरी लावणार असून सरकारने दलित कल्याणासाठी केलेल्या कामाचा पाढा वाचणार आहेत.

BJP's eye on SC votes | एससी मतांवर भाजपाचा डोळा 

एससी मतांवर भाजपाचा डोळा 

Next
ठळक मुद्देअनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला अमित शहा येणार

लोकमत न्यूज नेटवर्क         
नागपूर : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपा सक्रिय झाली आहे. १९ व २० जानेवारी रोजी नागपुरात आयोजित अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीया अधिवेशनाच्या माध्यमातून एससी मतांवर लक्ष केंद्रित करण्याचे नियोजन भाजपाने केले आहे. विशेष म्हणजे २० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता कस्तूरचंद पार्क येथे या अधिवेशनात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हजेरी लावणार असून सरकारने दलित कल्याणासाठी केलेल्या कामाचा पाढा वाचणार आहेत.
अधिवेशनात देशभरातील ५०० प्रतिनिधी सहभागी होतील. पक्षाचे खासदार, आमदार, राष्ट्रीय व प्रदेश पदाधिकारी यांच्यासह अनुसूचित जाती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग असेल. अधिवेशन वसंतराव देशपांडे सभागृहात होईल. या परिसराला राजर्षी छत्रपति शाहू महाराज समता परिसर असे नाव देण्यात आले आहे. अधिवेशनासाठी येणारे बहुतांश ज्येष्ठ नेते दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला अभिवादन करतील. या अधिवेशनाच्या तयारीसाठी शनिवारी पक्षाच्या शहर कार्यालयात आढावा बैठक झाली. शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी बैठकीत व्यवस्था प्रमुखांची घोषणा केली. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे राहतील. व्यवस्था प्रमुख सुधाकर कोहळे असतील. अधिवेशन कार्यालय, निवास, वाहन, नोंदणी, भोजन, प्रतिनिधि स्वागत आदी जबाबदारी पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
लखनौ येथे होणार होते अधिवेशन
 अधिवेशन उत्तर प्रदेशातील लखनौ येथे प्रस्तावित होते. महाराष्ट्र भाजपाने ते नागपुरात घेण्याची मागणी केली. सुरुवातीला मुंबईचे नाव निश्चित झाले होते. मात्र, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची विदर्भात वाढती सक्रियता लक्षात घेता हे अधिवेशन नागपुरात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आपण एससी समाजासाठी कटिबद्ध आहोत, असा संदेश भाजपाला या अधिवेशनाच्या माध्यमातून द्यायचा आहे.

Web Title: BJP's eye on SC votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.