नागपूर जिल्ह्यात मौदा नगराध्यक्षपदी भाजपच्या भारती सोमनाथे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 15:20 IST2018-12-10T15:18:30+5:302018-12-10T15:20:39+5:30
जिल्ह्यातील मौदा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या भारती सोमनाथे विजयी झाल्या. सोमनाथे यांनी २५७३ मते मिळवित काँग्रेसच्या रोशनी निनावे यांचा पराभव केला.

नागपूर जिल्ह्यात मौदा नगराध्यक्षपदी भाजपच्या भारती सोमनाथे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: जिल्ह्यातील मौदा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या भारती सोमनाथे विजयी झाल्या. सोमनाथे यांनी २५७३ मते मिळवित काँग्रेसच्या रोशनी निनावे यांचा पराभव केला. निनावे यांना २४४५ मते मिळाली.
मौद्या नगर पंचायतीच्या १७ वॉर्ड आणि नगराध्यक्ष पदासाठी रविवारी ७७.५६ टक्के मतदान झाले होते. यात नगराध्यक्षपदासाठी ९ तर नगरसेवक पदासाठी १०१ उमेदवार रिंगणात होते. सोेमवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली.
मौद्यात राज्याचे ऊर्जामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे भाजपाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. मौैदा नगरपंचायतीची निवडणुक जाहीर झाल्यापासून अखेरच्या क्षणापर्यंत पालकमंत्र्यांची निवडणूक यंत्रणा मौद्यात कार्यरत होती.
मौद्यातील १७ वॉर्डात भाजपाचे ८, काँग्रेसचे ५, शिवसेनेचे २ आणि २ अपक्ष उमेदवार निवडूण आले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष शिवराज गुजर मौद्याचे असले तरी राष्ट्रवादीला येथे फार चमत्कार करता आला नाही. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पुुष्पा गभणे १०१० मते मिळवित चौथ्या क्रमांकावर राहील्या. येथे शिवसेनेच्या रंजना धनजोेडे यांनी १५५८ मिळवित तिसरा क्रमांक गाठला.
असा आहे निकाल :
नगराध्यक्ष पद
भारती सोमनाथे (भाजपा) - २५७३ मते
रोशनी निनावे (कॉग्रेस) - २४४५ मते
रंजना धनजोडे (शिवसेना) - १५५८ मते
पुष्पा गभणे (राष्ट्रवादी) - १०१० मते
भारती सोमनाथे १२८ मतांनी विजयी
एकूण जागा - १७
भाजपा - ८
काँग्रेस - ५
शिवसेना - २
राष्ट्रवादी - ०
अपक्ष - २
हे आहेत नगरसेवक :
वार्ड क्र . १ - भिमराव मेश्राम (अपक्ष), वार्ड क्र . २ - जॉनी चलसानी (भाजपा), वार्ड क्र .३ - प्रियंका काळमेघ (कॉग्रेस ), वार्ड क्र . ४ - शशिकला पत्रे (कॉग्रेस), वार्ड क्र . ५ - किशोर सांडेल (कॉग्रेस), वार्ड क्र . ६ - विमल पोटभरे (भाजपा ), वार्ड क्र . ७ - वैशाली चव्हाण (अपक्ष), वार्ड क्र . ८ - सुनिता पाराशर (भाजपा), वार्ड क्र . ९ - शुभम तिघरे (कॉग्रेस), वार्ड क्र . १० - वैशाली मेहर (शिवसेना), वार्ड क्र . ११- सुषमा कुंभलकर (भाजपा ), वार्ड क्र . १२ - सुनिल रोडे (भाजपा), वार्ड क्र . १३ - देविदास कुंभलकर (भाजपा ), वार्ड क्र . १४ - शिवराज माथुरकर (शिवसेना ), वार्ड क्र . १५ - नंदा इनवाते (कॉग्रेस), वार्ड क्र . १६- राकेश धुर्वे (भाजपा), वार्ड क्र . १७ - शालिनी कुहीकर (भाजपा)
.