शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 19:35 IST

Shyam Manav nagpur news: सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांचे भाषण नागपूरमध्ये आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचा प्रकार घडला आहे. 

Shyam Manav Latest News: अंधश्रद्धा निर्मूल समितीच्या वतीने नागपूरमध्येश्याम मानव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. श्याम मानव यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यामुळे काही काळ कार्यक्रम स्थळी तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत भाजपाच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले. 

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने नागपूरमध्ये श्याम मानव यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याने व्यासपीठावरील व्यक्तींना प्रश्न विचारला की, २०१४ पासून संविधानात काय बदल झाले? आम्हाला सांगा. त्यानंतर भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.  

भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते म्हणाले, अंधश्रद्धा निर्मूलन समिती संविधानाचा आधार घेऊन जर समाजात भेदभाव करत असेल आणि फडणवीस साहेबाचं नाव घेत असेल, तर हे कुणाचे समर्थक आहेत? यांनी उत्तर द्यावं. यांनी कुणाचा ठेका घेतला आहे? २०१४ नंतर संविधानात असे कुठले बदल झाले? हे कोणत्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात, हे त्यांनी सांगावं, असे सवाल भाजपा कार्यकर्त्यांनी केले.

श्याम मानव काय म्हणाले?

"ज्या नागपूरमध्ये वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र राहतात. जाहीरपणे एका व्यासपीठावर येऊन मते मांडतात. त्या नागपूरमधूनच संविधान खतम होत आहे, या पद्धतीची परिस्थिती निर्माण होत चालली आहे. मला अशा गोष्टींची नेहमी सवय आहे.माझ्यासाठी नवी गोष्ट नाहीये", असे श्याम मानव म्हणाले. 

"ज्या पद्धतीचा गोंधळ सुरू झाला... विषयच असा आहे की, संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव. आमचा एक वक्ता बोलत असताना मध्ये या पद्धतीने गोंधळ घालणं, म्हणजे ही केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरची गदा नाही, ही लोकशाहीवरची गदा आहे. आचारसंहिता घोषित झाल्यानंतर जर हे लोक या पद्धतीने वागत असतील, तर हे किती संविधान वाचवणारे आहेत की बुडवणारे आहेत, याचा उत्कृष्ठ पुरावा ते लोकांसमोर देत आहेत", अशी भूमिका श्याम मानव यांनी  मांडली.

टॅग्स :shyam manavश्याम मानवMaharashtraमहाराष्ट्रnagpurनागपूरmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४