शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री, पदाधिकाऱ्यांप्रमाणेच भाजपच्या कार्यकर्त्यांनाही शंभर दिवसांचे 'टार्गेट'

By योगेश पांडे | Updated: June 4, 2025 12:53 IST

प्रत्येक कार्यकर्ता : पदाधिकाऱ्याला 'कमळ' चिन्ह लावावे लागणार

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने निष्क्रिय कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी नियोजन केले आहे. राज्यात मंत्री व प्रशासनातील अधिकाऱ्यांना शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम देण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांनाही शंभर देण्यात येत आहे. निवडणुकीपर्यंत जो मार्ग मिळेल, त्याने पक्षाचे हरत-हेने शक्तिप्रदर्शन करावे, असे पदाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक कार्यकर्ता - पदाधिकाऱ्याने 'कमळ' चिन्ह लावून फिरावे. त्यातून वातावरणनिर्मिती करावी, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

नागपुरात मंगळवारी विदर्भविभागीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत विदर्भातील ३० मंडळांतील पदाधिकारी उपस्थित होते. कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावेळी पक्षाच्या धुरिणांनी आखलेले नियोजन या पदाधिकाऱ्यांसमोर मांडले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काहीही करून भाजप क्रमांक एकचा पक्ष राहिला पाहिजे. त्या १०० दिवसांचा संघटनात्मक कार्यक्रम आखण्यात आला आहे. अगदी सुक्ष्म पातळीवर जाऊन लोकांशी संपर्क साधावा. तसेच प्रत्येक बूथवरील पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीचे वाटप आत्ताच करण्यात यावे, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

'कमळ' चिन्हाच्या 'मार्केटिंग'वर भरभाजपकडून पुढील काही कालावधीत पक्षाचे चिन्ह असलेल्या 'कमळ'च्या मार्केटिंगवर भर देण्यात येणार आहे. पक्षाच्या बूथपातळीपासून ते राज्य पातळीपर्यंतच्या कार्यकर्त्यापर्यंत सर्वांनीच शर्ट किंवा साडीवर 'कमळ' चिन्ह लावूनच घराबाहेर निघावे, अशी सूचना देण्यात आली आहे. 'कमळ' चिन्हाबाबत वातावरणनिर्मिती व्हावी, यासाठी पक्षाच्या धुरिणांनी हे नियोजन केले आहे.

पक्षाच्या मार्केटिंगसाठी होर्डिंग-बॅनरबाजी करा१०० दिवसांत राज्यभरात भाजपचीच चर्चा राहिली पाहिजे, यावर पक्षनेत्यांचा भर आहे. त्यामुळेच जनतेपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात भाजपचीच चर्चा राहावी, या दृष्टीने पदाधिकाऱ्यांना नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पक्षाचे काहीही करून शक्तिप्रदर्शन झाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक वाटले तर होर्डिंग लावा किंवा बॅनरबाजी करा. मात्र, पक्षाचे योग्य मार्केटिंग झालेच पाहिजे, असे निर्देश चव्हाण यांनी दिले आहेत.

'बूथ मॅपिंग' करण्याची सूचनाविधानसभा निवडणुकीत भाजपला बऱ्याच बूथवर अपेक्षित यश मिळाले नव्हते. अशा बूथवर कार्यकर्ते जोडून 'बूथ मॅपिंग' करण्याचे 'टार्गेट' पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. पक्षाकडे प्रत्येक मंडळातील बूथची 'अपडेटेड' माहिती आहे. विदर्भातील जिल्हाध्यक्षांना मंगळवारी तो सविस्तर 'डेटा' सोपविण्यातही आला असल्याची माहिती पक्षाच्या सुत्रांनी दिली.

टॅग्स :nagpurनागपूरBJPभाजपा