शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

"कशाला नामुष्की करून घेता.. तुमचे २०-२५ पुन्हा आमच्याकडे येणार आहेत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 12:23 IST

अधिवेशनाच्या शेवटी अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रकार म्हणजे फुसकी बॉम्ब - बावनकुळे

नागपूर :महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाचे पत्र काल विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे देण्यात आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना कशाला नामुष्की करून घेता, तुमचे २०-२५ पुन्हा आमच्याकडे येणार आहेत म्हणत विरोधी पक्षावर टीकास्त्र सोडले. अविश्वास प्रस्ताव आणायचाच होता तर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आणायला पाहिजे होता. शेवटच्या दिवशी अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रकार म्हणजे फुसकी बॉम्ब आहे. हा फुसकी बॉम्ब सोडू नये, उद्या जर हा विषय सभागृहात आला आणि मतदान झालं तर १८४ च्या वर मतं मिळतील असं बावनकुळे म्हणाले.

या अधिवेशनात विरोधीपक्ष हा फुटकळ-फुटकळ होता. ते काय विकासाचं बोलले? त्यांनी आपली भूमिका योग्यपणे मांडली का?  विदर्भ-मराठवाड्याला विकासासाठी सरकारकडून काय काढून घेता येईल, यासाठी त्यांनी बाजू मांडली का? शेतकऱ्यांना १२ तास वीज पुरवठा देण्याबाबत ते कधी भांडले का, मिहानबद्दल भांडले का? असा सवाल करीत विरोधकांनी ९० टक्के भावनात्मक पद्धतीने जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप बावनकुळेंनी केला.

विरोधकांचा कारभार दुटप्पी आहे, सभागृह काय विधानपरिषदेतही त्यांच्यात एकमत नाही. या सरकारने योग्य काम केलं. विदर्भ-मराठवाड्याला न्याय देण्याच्या घोषणा केल्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अडीच वर्ष धानाला बोनस मिळवण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी १२ तास वीजपुरवठ्याबाबत अजित पवार यांच्यापुढे नाक रगडलं परंतु, काहीच मिळाले नाही. शेवटी या सरकारने विरोधकांनी मागणी न करताही स्वत:हून धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस व इतरही सर्व घटकांना न्याय दिला, असंही बावनकुळे म्हणाले.

मतभेद की आणखी काही?; विरोधकांच्या 'त्या' अविश्वास ठरावावर विरोधी पक्षनेते अजित पवारांची सहीच नाही!

दरम्यान, काल महाविकास आघाडीची काँग्रेस विधीमंडळाच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा प्रस्ताव मांडण्याचा निर्णय घेण्यात आला, या प्रस्तावार महाविकास आघाडीतील ३९ आमदारांनी सह्या केल्या. पण, हा ठराव तांत्रिक पातळीवर टिकणे अवघड असल्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सही केली नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अविश्वास ठराव दिला असला तरी याबाबत महाविकास आघाडीत एकमत नसल्याचे चित्र समोर आले आहे. 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीRahul Narvekarराहुल नार्वेकरAjit Pawarअजित पवार