नागपूर :नागपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला यश मिळाले आहे. भाजपाच्या नीता ठाकरे यांची महापौरपदी, तर लीला हाथीबेड यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली.
महापौर व उपमहापौर पदासाठी झालेल्या मतदानात नीता ठाकरे व लीला हाथीबेड यांना प्रत्येकी १०४ मते मिळाली. काँग्रेसकडून महापौरपदासाठी स्नेहल ठाकरे, तर उपमहापौर पदासाठी विवेक निकोसे हे उमेदवार रिंगणात होते. मात्र त्यांना प्रत्येकी ३६ मतांवर समाधान मानावे लागले.
या निवडणुकीत एमआयएमचे ६, मुस्लिम लीगचे ४ तसेच बसपाच्या एका सदस्याने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे भाजपाच्या उमेदवारांचा विजय सुकर झाला. निवडीनंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी महापौर व उपमहापौरांचा सत्कार करत जल्लोष साजरा केला.
Web Summary : BJP's Neeta Thackeray elected Nagpur Mayor, Leela Hatibed Deputy Mayor. They secured 104 votes each, defeating Congress candidates. AIMIM, Muslim League, and BSP abstained, ensuring BJP's easy victory. Celebrations followed the election.
Web Summary : भाजपा की नीता ठाकरे नागपुर की महापौर और लीला हाथीबेड उपमहापौर चुनी गईं। उन्होंने कांग्रेस उम्मीदवारों को हराकर 104 वोट हासिल किए। एआईएमआईएम, मुस्लिम लीग और बसपा अनुपस्थित रहे, जिससे भाजपा की आसान जीत सुनिश्चित हुई। चुनाव के बाद जश्न मनाया गया।