नागपुरात भाजपा पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:57 IST2018-11-15T00:54:52+5:302018-11-15T00:57:04+5:30

भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी देवडिया काँग्रेस भवनात काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. माजी खा. विलास मुत्तेमवार आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी भाजपाचे पदाधिकारी रवी भैसारे, सुदर्शन सातपुते, कमलेश कोठावार, अरुण शेंडे, महेंद्र इंदूरकर, मंगेश उसरे आदींसह अन्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे काँग्रेसचा दुपट्टा देऊन स्वागत केले.

BJP office bearers entering congress at Nagpur | नागपुरात भाजपा पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नागपुरात भाजपा पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

ठळक मुद्देत्रस्त होऊन दिला भाजपचा राजीनामा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी देवडिया काँग्रेस भवनात काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. माजी खा. विलास मुत्तेमवार आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी भाजपाचे पदाधिकारी रवी भैसारे, सुदर्शन सातपुते, कमलेश कोठावार, अरुण शेंडे, महेंद्र इंदूरकर, मंगेश उसरे आदींसह अन्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे काँग्रेसचा दुपट्टा देऊन स्वागत केले.
रवी भैसारे म्हणाले, देशात आणि राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर विकासाची अपेक्षा फोल ठरली. अनुसूचित समाजावर अत्याचार वाढला आणि मनुवादाला प्रोत्साहन मिळाले. नागरिकांना दिलेले आश्वासन आणि तुघलकी निर्णयामुळे परिसरातील नागरिक दोष देत आहेत. त्यामुळे त्रस्त होऊन भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.
याप्रसंगी पंकज लोणारे, विवेक रमेश निकोसे, दिनेश बानाबाकोडे, वीणा बेलगे, संदीप सहारे, पीयूष लाडे, धरम पाटील आसिफ शेख, हर्षल पाल, बादल वाहणे, अनमोल लोणारे, मंगेश उसरे, पवन सोमकुंवर, सुनीता ढोले उपस्थित होते.

 

Web Title: BJP office bearers entering congress at Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.