राज्यातील भाजप खासदार-आमदार, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल; बिहार यशाचा जल्लोष प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 12:52 AM2020-11-13T00:52:04+5:302020-11-13T07:00:43+5:30

बिहार यशाचा जल्लोष, गर्दी जमविली

BJP MP-MLA, charges filed against activists | राज्यातील भाजप खासदार-आमदार, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल; बिहार यशाचा जल्लोष प्रकरण

राज्यातील भाजप खासदार-आमदार, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल; बिहार यशाचा जल्लोष प्रकरण

Next

नागपूर : कोरोना संसर्गाचा धोका दुर्लक्षित करून बिहार निवडणूक यशाचा जल्लोष करणाऱ्या भाजप आमदार, खासदारासह ६० ते ७० जणांवर गणेशपेठ पोलिसात गुन्हे दाखल झाले.

बिहार निवडणुकीत रालोआला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे बुधवारी सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान गणेशपेठमध्ये जल्लोष करण्यात आला. या कार्यक्रमाची पूर्वपरवानगी पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडून घेतली नाही. गर्दी जमविण्यास मनाई असतानाही मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.  त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. याची दखल घेऊन गणेशपेठ पोलिसांनी खासदार  विकास महात्मे, भाजप शहराध्यक्ष व आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे  यांच्याशिवाय ६० ते ७० कार्यकर्त्यांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: BJP MP-MLA, charges filed against activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.