शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

मुंढेंविरोधात भाजप आमदार आक्रमक : पोलीस आयुक्तांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 22:54 IST

महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात भाजपच्या आमदारांनीदेखील आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी भाजप आमदारांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन मुंढे यांची तक्रार केली. मुंढे यांनी ‘स्मार्ट सिटी’चे ‘सीईओ’ म्हणून काम करताना नियमांचे उल्लंघन करत कंत्राटदाराला २० कोटी रुपयांचा निधी दिला, अशी आमदारांची तक्रार आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र बँकेकडेदेखील नोंदविला आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात भाजपच्या आमदारांनीदेखील आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी भाजप आमदारांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन मुंढे यांची तक्रार केली. मुंढे यांनी ‘स्मार्ट सिटी’चे ‘सीईओ’ म्हणून काम करताना नियमांचे उल्लंघन करत कंत्राटदाराला २० कोटी रुपयांचा निधी दिला, अशी आमदारांची तक्रार आहे.भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, आ. नागो गाणार, आ.अनिल सोले, आ. गिरीश व्यास, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते यांनी पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेतली. २१ जून रोजी महापौर संदीप जोशी व सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी कंत्राटदाराला निधी दिल्याप्रकरणात पोलीस तक्रार केली होती. या प्रकरणाची अद्यापपर्यंत चौकशी सुरू झालेली नाही. आयुक्तांविरोधात कारवाई न होणे ही दुर्दैवी बाब आहे, असे तक्रारीत नमूद आहे. पक्षाच्या आमदारांनी बँक आॅफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापकांचीदेखील भेट घेतली व त्यांना निवेदन दिले. ‘स्मार्ट सिटी’च्या बँक खात्यात मुंढे यांचे नाव जोडण्याला आमदारांनी आक्षेप घेतला. नाव जोडल्यानंतर मुंढे यांच्या स्वाक्षरीने पैसे काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेPoliceपोलिसBJPभाजपाMLAआमदार