शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

संघभूमीत भाजपला अतिआत्मविश्वास नडला; उमेदवार बदलणे पडले महागात, कॉंग्रेसला उभारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 07:42 IST

भाजपने मागील दीड वर्षापासूनच या मतदारसंघावर विशेष लक्ष असल्याची एकूण हवा बनविली होती.

योगेश पांडेनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्मभूमी, दिल्लीतील नेत्यांपासून ते गल्लीतील पदाधिकाऱ्यांपर्यंतची फौज आणि विशेष म्हणजे मागील ५८ वर्षांचा ‘नॉटआऊट’ इतिहास. इतक्या सर्व जमेच्या बाजू असतानादेखील भाजपला नागपूर पदवीधर मतदारसंघाचा बालेकिल्ला राखता आला नाही. तुलनेने नवखे व तरुण असलेल्या अभिजीत वंजारी यांनी आपले कौशल्य दाखवत भाजपच्या धुरिणांना त्यांच्याच कर्मभूमीत धूळ चारली. भाजपच्या पराभवामागे विविध कारणे असली तरी या जागेच्या विजयासंदर्भातील अतिआत्मविश्वास त्यांना भोवल्याचे चित्र आहे.

भाजपने मागील दीड वर्षापासूनच या मतदारसंघावर विशेष लक्ष असल्याची एकूण हवा बनविली होती. मात्र प्रत्यक्षात माजी आमदार अनिल सोले व काही चेहरे वगळता इतरांचा मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क तुटला होता. गडकरी यांचे खंदे समर्थक असलेल्या सोले यांना अखेरपर्यंत उमेदवारी तुमचीच, असे आश्वासन देण्यात आले होते.  प्रत्यक्षात ऐनवेळी संदीप जोशी यांना उमेदवारी दिल्याने पक्षातदेखील अंतर्गत नाराजीचा सूर होता. सोबतच मनपाचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांना जनसमर्थन लाभत असताना त्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने जोशी वादात सापडले होते. सोशल मीडियावर तर जोशी यांच्याविरोधात मोहीमच चालविण्यात आली.

मात्र भाजपच्या प्रचारयंत्रणेने या बाबीसह जातीय समीकरणांचा मुद्दा फारसा गंभीरतेने घेतला नाही. याचा फटका निश्चित मतदानादरम्यान बसला. दुसरीकडे स्वच्छ प्रतिमा आणि कामातील प्रतिभा यांच्या जोरावर वंजारी मतदारांमध्ये गेले. मागील दीड ते दोन वर्षांपासून वंजारी यांचे वैयक्तिक प्रयत्न, नोंदणीवर देण्यात आलेला भर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तळागाळापर्यंत संपर्काचे नियोजन या त्रिसूत्रीमुळे त्यांना मैदान मारता आले. नागपूर विद्यापीठातील त्यांचे मागील १५ वर्षांचे कामदेखील मतदारांसमोर होते. आधी लगीन पदवीधरचे अशी भूमिका घेत ऐनवेळी गटबाजीला दूर सारत काँग्रेसचे नेते प्रचारात एकत्र आले व वंजारी यांनी अनोखा करिष्मा करून दाखविला. पदवीधरच्या या विजयाने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन जोश भरला असून भविष्यात भाजपसमोरील  आव्हाने वाढणार हे निश्चित आहे.

टॅग्स :nagpurनागपूरcongressकाँग्रेसBJPभाजपा