शहरं
Join us  
Trending Stories
1
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
2
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
3
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
4
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
5
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
6
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
7
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
8
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
9
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
10
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
11
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
12
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
13
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
14
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
15
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
16
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
17
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
18
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
19
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
20
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरमध्ये भाजपकडून तरुणतुर्काना संधी; दीड डझनाहून नगरसेवकांना डच्चू

By योगेश पांडे | Updated: December 30, 2025 12:35 IST

यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्मचे वाटप : बंगाले, तभाने, टांक यांच्यासह अनेकांना धक्का, भाजपकडून उमेदवारीसाठी अठराशेहून अधिक होते इच्छुक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने अतिशय 'सेफ गेम' खेळत उमेदवारांची यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्मचे वाटप केले. बऱ्याच माजी नगरसेवकांना डच्चू देत भाजपकडून तरुणतुर्वांना संधी देण्यात आली आहे. माजी नगरसेवकांची मागील काही कालावधीतील निष्क्रियता, जनतेत त्यांच्याबाबत असलेला रोष यामुळे भाजपने नवीन चेहऱ्यांवर जास्त विश्वास टाकला आहे. सोमवारी ८०हून अधिक एबी फॉर्मचे वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचे विश्वासू संजय बंगाले, दीपराज पार्डीकर यांच्यासह अनेकांना पक्षाने धक्का दिला आहे.

भाजपकडून अठराशेहून अधिक इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते व मुलाखतीदेखील झाल्या होत्या. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबर असतानादेखील यादी जाहीर न झाल्याने इच्छुकांमध्ये बेचैनी वाढली होती. पक्षाकडून दोन दिवसअगोदर जवळपास ३०० जणांना अर्ज दाखल करण्यासाठी तयार राहण्याचे संदेश देण्यात आले होते. मात्र, त्यातदेखील छाननी करण्यात आली व रात्री ८ वाजेपर्यंत जवळपास ९० जणांना फोन करून एबी फॉर्म घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात बोलविण्यात आले.

एका प्रभागात 'वन्स मोअर'

भाजपने जवळपास सर्वच प्रभागांत नवीन चेहरे दिले असले तरी प्रभाग क्रमांक एकमध्ये मात्र २०१७ चेच चारही उमेदवार दिले आहेत. त्यात विरेंद्र कुकरेजा, प्रमिला माथरानी, सुषमा चौधरी, महेंद्रप्रसाद धनविजय यांचा समावेश आहे. माजी नगरसेविका डॉ. परिणिता फुके, अविनाश ठाकरे, नंदा जिचकार यांनी नवीन कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी विनंती केली होती. पक्षाने तेथे नवीन लोकांना संधी दिली आहे. प्रभाग १३ मधील चारही उमेदवार हे आमदार परिणय फुके यांच्या शिफारशीवरून देण्यात आले आहेत.

अकोल्यात भाजपचे राष्ट्रवादीशी जुळले

अकोला महापालिकेत भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) व शिंदेसेना यांच्यातील वाटाघाटींना सोमवारी उशिरा निर्णायक वळण मिळाले. अजित पवार गट यांच्यात जागावाटपावर एकमत झाले.

अमरावतीः शिंदेसेनेला हव्यात जास्त जागा

अमरावती महापालिका निवडणुकीत नामनिर्देशन पत्र भरण्यास मंगळवार शेवटचा दिवस आहे. २२ प्रभागात ८७ सदस्य निवडीसाठी ही निवडणूक होत आहे. मात्र भाजप-शिंदेसेनेत युतीत जागा वाटपावरून तिढा कायम आहे. भाजप शिंदेसेनेला कमी जागा देत असल्यामुळे माजी राज्यमंत्री जगदिश गुप्ता हे नाराज झाले. ते मंगळवारी पत्रपरिषदेतून भूमिका जाहीर करणार आहेत.

चंद्रपूर : आघाडीतील समन्वय कठीण

चंद्रपूर महापालिकेसाठी अर्ज भरण्याची मुदत जवळ येत असताना काँग्रेस व भाजपच्या उमेदवार याद्या जाहीर झालेल्या नाहीत. काँग्रेसमध्ये जागावाटपावर रस्सीखेच सुरू आहे. विजय वडेट्टीवार चंद्रपुरात ठाण मांडून आहेत.

भोयर, बेहते यांना धक्का

अनेक प्रभागांतील आरक्षण बदलले होते. मात्र, पक्षाकडून काही उमेदवारांना दुसऱ्या प्रभागात स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात पक्षाने काही माजी नगरसेवकांना मोठा धक्का दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानसभा क्षेत्रातील प्रभाग ३६ मध्ये चारही चेहरे नवीन आहेत. माजी नगरसेवक लहूकुमार बेहते, पल्लवी शामकुळे, प्रकाश भोयर यांना एबी फॉर्म देण्यात आलेले नाहीत. प्रभाग ४ मध्ये राजकुमार साहू यांच्याऐवजी रामदास साहू यांना संधी देण्यात आली आहे. प्रभाग ११ मध्ये अर्चना पाठक यांना एबी फॉर्म न देता ममता ठाकूर यांच्यावर विश्वास टाकण्यात आला आहे. प्रभाग १३ मध्ये अमर बागडे यांना धक्का बसला आहे. प्रभाग १५ मध्ये संजय बंगाले, उज्ज्वला शर्मा यांना एबी फॉर्म मिळालेला नाही. प्रभाग १६ मध्ये वनिता दांडेकर यांच्याऐवजी त्यांचे सुनील यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. तर प्रभागाबाहेरील वर्षा चौधरी यांनाही संधी मिळाली आहे. प्रभाग २४ मध्ये चेतना टांक यांना मोठा धक्का बसला आहे. तर प्रभाग २६च्या माजी नगरसेविका समिता चकोले, मनीषा कोठे यांना कुठूनही संधी मिळालेली नाही. प्रभाग ३२ मध्ये अभय गोटेकर, दीपक चौधरी यांना एबी फॉर्म मिळालेला नाही, तर कल्पना कुंभलकर यांच्याऐवजी त्यांचे पती राम यांना संधी मिळाली आहे. प्रभाग ३५ मध्ये जयश्री वाडीभस्मे यांना एबी फॉर्म मिळालेला नाही. प्रभाग ३७ मध्ये माजी नगरसेवक प्रमोद तभाने, सोनाली कडू यांना कुठल्याही प्रभागातून संधी देण्यात आलेली नाही. 

एबी फॉर्म देण्यात आलेल्यांची नावे

प्रभाग १- विरेंद्र कुकरेजा, प्रमिला माथरानी, सुषमा चौधरी, महेंद्रप्रसाद धनविजयप्रभाग २ - अनिकेत येरखेडे, नेहा निकोसे, पंकज यादव, सविता मानेप्रभाग ४ - शेषराव गोतमारे, निरंजना पाटील, मनीषा अतकरे, रामदास साहूप्रभाग ५ - संजय चावरेप्रभाग ७ - राखी मानवटकर, ओमप्रकाश इंगळे, नवनीत तुली, मीना तरारेप्रभाग ८ - श्रेयस कुंभारे, तृप्ती खंगार, कामिल अन्सारीप्रभाग ९ - मनोरमा जैस्वालप्रभाग ११ - भूषण शिंगणे, संगीता गिन्हे, संदीप जाधव, ममता ठाकूरप्रभाग १२ - मायाताई इवनाते, साधना बरडे, दर्शनी धवड, विक्रम ग्वालबंशीप्रभाग १३ - वर्षा ठाकरे, किसन गावंडे, योगेश पाचपोर, ऋतिका मसरामप्रभाग १४ - प्रगती पाटील, माधुरी टेकाम, योगिता तेलंग, विनोद कन्हेरेप्रभाग १५ - विनय दाणी, पूजा पाठक, धनश्री देशपांडे, सुनील हिरणवारप्रभाग १६ - लखन येरवार, लक्ष्मी यादव, सुनील दांडेकर, वर्षा चौधरीप्रभाग १७ - श्रद्धा चुटेले, प्रमोद चिखले, मोरेश्वर साबळेप्रभाग १९ - संजयकुमार बालपांडेप्रभाग २० - हेमंत बरडे, रेखा निमजे, स्विटी भिसीकरप्रभाग २१ - विशा भोयर प्रभाग २३ - बाल्या बोरकरप्रभाग २४ - दुर्गेश्वरी कोसेकर, अरुण हारोडे, प्रदीप पोहाणे, सरिता कावरेप्रभाग २६ - धर्मपाल मेश्राम, सीमा ढोमणे, शारदा बारई, बंटी कुकडेप्रभाग २८ - नंदा येवले, नीता ठाकरे, पिंटू झलके, किरण दातीरप्रभाग २९ - लीलाताई हाथीबेड, योगेश मडावी, अजय बोडारेप्रभाग ३१ - मंगला म्हस्के प्रभाग २३ - बाल्या बोरकरप्रभाग २४ - दुर्गेश्वरी कोसेकर, अरुण हारोडे, प्रदीप पोहाणे, सरिता कावरेप्रभाग २६ - धर्मपाल मेश्राम, सीमा ढोमणे, शारदा बारई, बंटी कुकडेप्रभाग २८ - नंदा येवले, नीता ठाकरे, पिंटू झलके, किरण दातीरप्रभाग २९ - लीलाताई हाथीबेड, योगेश मडावी, अजय बोडारेप्रभाग ३२ - रितेश पांडे, रूपाली ठाकूर, रामभाऊ कुंभलकर, गुणप्रिया शेंडेप्रभाग ३४ - मंगला खाखरेप्रभाग ३५ - संदीप गवई, विशाखा मोहोड, रमेश भंडारी, पूजा भूगावकरप्रभाग ३६ - ईश्वर ढेंगळे, अमोल शामकुळे, शिवानी दाणी, माया हाडेप्रभाग ३७ - अश्विनी जिचकार, निधी तेलगोटे, दिलीप दिवे, संजय उगलेप्रभाग ३८ - महेश्वरी पटले, आनंद नितनवरे, प्रतिभा राऊत 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP gives opportunity to youth in Nagpur, many corporators dropped.

Web Summary : BJP favored youth in Nagpur elections, denying tickets to many corporators due to inactivity and public dissatisfaction. The party distributed AB forms, prioritizing fresh faces. Allies in Akola finalize seat sharing. Tensions rise in Amravati over seat allocation with Shinde Sena.
टॅग्स :Nagpur Municipal Corporation Electionनागपूर महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाnagpurनागपूरElectionनिवडणूक 2026