शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

“राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा द्यावा”; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 14:14 IST

Devendra Fadnavis News: मनसेशी काही चर्चा आमच्या गेल्या काही काळात झालेल्या आहेत, असे सांगत एकनाथ खडसे यांचे पक्षात स्वागत करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Devendra Fadnavis News:मनसेशी काही चर्चा आमच्या गेल्या काही काळात झालेल्या आहेत. विशेषतः मनसेनी जेव्हापासून हिंदुत्वाचा अजेंडा घेतला, तेव्हापासून त्यांची आणि आमची एकप्रकारे जवळीक वाढली आहे. निश्चितपणे आमची अपेक्षा अशी आहे की, राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीसोबत राहील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  २०१४ मध्ये राज ठाकरे असे व्यक्ती होते, ज्यांनी जाहीरपणे भूमिका घेत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायला हवे, असे म्हटले होते. मात्र, मधल्या काळात त्यांनी वेगळी भूमिका घेतली. गेल्या १० वर्षांत ज्या प्रकारे पंतप्रधान मोदी यांनी भारताचा विकास केला. एका नव्या भारताची निर्मिती ही त्या ठिकाणी झाली, हे आता त्यांनाही मान्य झाले असेल. अशा परिस्थितीत सर्व लोकांनी पंतप्रधान मोदी यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. विशेषतः जे लोक राष्ट्रीय विचारांनी प्रेरित आहेत, ज्यांच्याकरिता राष्ट्र प्रथम आहे, समाज प्रथम आहे, त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत राहायला हवे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा द्यावा

राज ठाकरे आणि मनसे पंतप्रधान मोदी यांच्यासोबत राहतील. राज ठाकरे यांचा पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा असेल. अर्थात त्यांचा पक्ष आहे, त्यांना निर्णय घेतला आहे. मात्र, यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. महायुतीत ज्या काही जागा आहेत, त्यांची एकत्रित घोषणा आम्ही करणार आहोत. प्रचाराला आता लागले पाहिजे. कारण, उमेदवार कुणीही असला तरी प्रचार कामी येतो. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी यांसह मित्र पक्षांनी जिथे उमेदवार घोषित व्हायचे आहेत, तिथे तयारी केली पाहिजे, असे आम्ही ठरवले आहे. मेळावे घ्या, असेही सांगितले आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

एकनाथ खडसे यांचे स्वागतच करू

एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार असल्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर, भाजपामध्ये पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास ठेवून कुणीही प्रवेश करत असेल, तरीदेखील त्या ठिकाणी कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. पक्षाने आम्हाला याबाबत कळवले नाही. पण अधिकृतरित्या पक्ष आम्हाला कळवेल, तेव्हा त्यांचे आम्ही स्वागतच करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, विदर्भात महायुतीला अनुकूलता आहे. ती विजयामध्ये परावर्तित होईल, याबाबत माझ्या मनात शंका नाही. १० एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी यांची सभा रामटेक मतदारसंघात होणार आहे. या सभांमुळे विदर्भाचा भाग ढवळून निघेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMahayutiमहायुतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४