शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे नगरसेवक पुणेकर मनसेचे खापेकर काँग्रेसमध्ये

By admin | Updated: January 7, 2017 02:40 IST

केंद्र, राज्य व महापालिकेतही भाजपची सत्ता असताना काँग्रेसमध्ये प्रवेश घेणाऱ्या नगरसेवकांचा आकडा सतत वाढत आहे.

 पुन्हा दोन नगरसेवकांची एन्ट्री : प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी दिला प्रवेश नागपूर : केंद्र, राज्य व महापालिकेतही भाजपची सत्ता असताना काँग्रेसमध्ये प्रवेश घेणाऱ्या नगरसेवकांचा आकडा सतत वाढत आहे. अपक्ष, बसपा, शिवसेना या पक्षातील नगरसेवकांनी काँग्रेसचा ‘हात’ पकडल्यानंतर शुक्रवारी भाजपचे नगरसेवक रमेश पु्णेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेत भाजपला मोठा धक्का दिला. चार दिवसांपूर्वी पुणेकर यांनी भाजपला रामराम ठोकला होता. मनसेचे नगरसेवक श्रावण खापेकर हे देखील काँग्रेसवासी झाले. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत दोन्ही नगरसेवकांचे प्रवेश झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दक्षिण नागपुरातील कार्यकर्ते प्रदीप वाडीभस्मे यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या निवडणुकीत वाडीभस्मे हे रिंगणात होते. चव्हाण यांनी तिरंगी दुपट्टा घालून संबंधितांना प्रवेश दिला. या वेळी शहर अध्यक्ष विकास ठाकरे उपस्थित होते. यापूर्वी पाच विद्यमान नगरसेवक व चार माजी नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. आता पुणेकर व सांदेकर यांच्या प्रवेशाने काँग्रेसचे मनोबल उंचावले आहे. ज्या जागेवर सक्षम उमेदवार नाहीत तेथे इतर पक्षातील सक्षम उमेदवारांना घेण्याचे धोरण काँग्रेसने स्वीकारले आहे. महापालिकेत १० वर्षे भाजपची सत्ता होती. मात्र, शहराचा विकास झाला नाही. जनतेचा व नगरसेवकांचाही भाजपवरील विश्वास उडाला आहे. नगरसेवक पुणेकर यांनी काँग्रेसमध्ये घेतलेला हे याचेच उदाहरण आहे. येत्या काळात आणखी काही सक्षम नेत्यांचे प्रवेश होतील, असा दावा शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी केला आहे.(प्रतिनिधी)