शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नगरसेविकेने रोखला पूल

By admin | Updated: April 29, 2015 02:39 IST

एकीकडे महापालिका काही भागात काम मंजूर न करताच कामाला सुरुवात करते तर मानकापूर रिंग रोड ....

कमलेश वानखेडे नागपूरनागपूर : एकीकडे महापालिका काही भागात काम मंजूर न करताच कामाला सुरुवात करते तर मानकापूर रिंग रोड परिसरातील संगमनगर पुलाच्या कामाचा वर्कआॅर्डर होऊन तीन महिने होऊनही महापालिकेने काम सुरू केलेले नाही. रविवारी सकाळी या पुलावरून दुचाकीने जात असलेल्या मुस्लिम दाम्पत्याला अपघात झाला व दुचाकीसह नाल्यात कोसळले. यात ते गंभीर जखमी झाले. वर्कआॅर्डर होऊनही या पुलाचे काम सुरू न होण्यामागे भाजपच्या नगरसेविका मीना तिडके यांनी टाकलेला राजकीय दबाव हेच प्रमुख कारण असल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. मात्र, नगरसेविका तिडके यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. मानकापूर रिंग रोड पसिरात राठोड लॉनच्या मागे संगम नगर आहे. या संगनगरला जाण्यासाठी एक नाला ओलांडून जावा लागतो. या नाल्याला गडरचे भरपूर पाणी असते. नाल्याला लागूनच मुस्लिम लोकवस्ती आहे. नाल्यावर पूल नसल्यामुळे ये-जा करण्यासाठी सिमेंटच्या फळ्या टाकण्यात आल्या आहेत. यावरूनच नागरिकांना आपली आपली दुचाकी वाहनेही न्यावी लागतात. रविवारी सकाळी शेख रफिक सैलानी हे पत्नीसह या पुलावरून जात असताना तोल जाऊन दुचाकीसह नाल्यात पडले. यात सैलानी हे जखमी झाले तर त्यांच्या पत्नीला गंभीर इजा झाली. त्यांना उपचारार्थ अवस्थीनगर येथील ओअ‍ॅसिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. संगमनगरचा हा पूल मुस्लिम वस्तीला जोडणारा आहे व या भागातील मुस्लिमांची मते महापालिकेच्या निवडणुकीत आपल्याला मिळाली नसल्याचा आकस म्हणून भाजपच्या नगरसेविका मीना तिडके यांनी या पुलाचे काम थांबविले असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. एकीकडे महापालिका काही भागात काम मंजूर न होताच कामाला सुरुवात करते तर येथे पुलाच्या कामाचा वर्कआॅर्डर होऊन तीन महिने होऊनही काम सुरू करीत नाही, यामागे तिकडे यांनी टाकलेला राजकीय दबाव हेच कारण असल्याचा आरोपही या भागातील नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. याबाबत मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वऱ्हाडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, संबंधित पुलाचे काम गेल्या चार महिन्यांपासून मंजूर आहे. तीन महिन्यांपूर्वीच वर्कआॅर्डरही देण्यात आला आहे. मात्र, संगमनगर पुलापासून काही अंतरावर नासुप्रतर्फे दुसरा पूल बांधण्यात येत आहे. त्यामुळेच त्याचवेळी महापालिकेनेही या पुलाचे काम सुरू केले तर दोन्हीकडून या वस्तीचा संपर्क तुटेल. त्यामुळे नासुप्रच्या पुलाचे काम पूर्ण झाल्यावर महापालिका या पुलाचे काम सुरू करेल. मात्र, लोकमतने केलेल्या पडताळणीत नासुप्रच्या पुलाच्या पूर्वीच महापालिकेने संगमनगर पुलाला मंजुरी दिली असूनही काम सुरू न केल्याचे स्पष्ट झाले आहे. या विलंबासाठी महापालिका प्रशासनाकडेही ठोस उत्तर नाही.६५ लाख रुपये मंजूर महापालिकेतर्फे संबंधित नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी ६५ लाख रुपये मंजूर केले आहेत. तीन महिन्यांपूर्वीच या कामासाठी वर्कआॅर्डर देण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही संबंधित काम सुरू झालेले नाही. नागरिकांच्या शिष्टमंडळाने यापूर्वीच आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष यांची भेट घेतली होती. पण काहीच झाले नाही. पुलासाठी मीच प्रयत्न केले- तिडके याप्रकरणी नगरसेविका मीना तिडके म्हणाल्या, मी कधीच मतांचे राजकारण करीत नाही. संगमनगर नाल्याला पूर आला असता आपणच पुढाकार घेऊन आयुक्तांना घेऊन पाहणी केली व पुलाचे काम मंजूर केले. वर्कआॅर्डर करून घेतला. या पुलापासून काही अंतरावरच नासुप्रतर्फे दुसरा पूल बांधल्या जात आहे. २०० लोकवस्तीसाठी कोणताही एक पूल पुरेसा आहे. शिवाय महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे हा निधी दुसरीकडे पूल बांधण्यासाठी वापरता येईल. पण काही लोक राजकारण करून मूळ मुद्दाच समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही, असेही तिडके यांनी सांगितले.