शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुकांमध्ये विदर्भात भाजप-काँग्रेसची असणार परीक्षा, हेविवेट नेत्यांना लागणार कस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 11:35 IST

Nagpur : नागपुरात मुख्यमंत्री, गडकरी, बावनकुळेंकडे राहणार प्रचाराची धुरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका निवडणुका न झाल्याने मार्च २०२२ पासून विदर्भातीलनागपूर, अमरावती, चंद्रपूर व अकोला महापालिकेचे प्रशासन प्रशासकांच्या हाती आहे. पुढील चार महिन्यांत निवडणुकांचा धुरळा उडणार असल्याने सर्वच पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः विदर्भातील या चारही महानगरपालिकांमध्ये भाजप व कांग्रेसमध्ये प्रमुख टक्कर आहे. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या नेत्यांचा कस लागणार आहे. विशेष म्हणजे चंद्रपुरात भाजपकडून माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर प्रचाराची धुरा देण्यात येते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

प्रशासक राज येण्यापूर्वी अकोल्यात ४८ नगरसेवक असलेल्या भारतीय जनता पक्षाची महापालिकेत सत्ता होती. तर नागपुरात भाजपकडे १०८ नगरसेवकांसह सत्तेची चावी होती. तर अमरावती व चंद्रपूरमध्येदेखील भाजपचीच सत्ता होती. 

चंद्रपूरमध्ये गटबाजीमुळे भाजप-काँग्रेसची अग्निपरीक्षाचचंद्रपूर जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या प्रभावी नेतृत्व म्हणून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे बघितले जाते. भाजप आणि काँग्रेसमध्ये वाढलेल्या अंतर्गत गटबाजीमुळे पक्षांची अग्निपरीक्षाच राहणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असले तरी संघटनात्मकदृष्ट्या माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पकड मजबूत आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात मुनगंटीवारांना स्थान न मिळाल्याने त्यांना डावलल्याचे चित्र आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मुनगंटीवारांवर भाजप परत विश्वास टाकणार की नव्या फळीला संधी देणार, यावर बरीच समीकरणे अवलंबून ठरतील. 

नागपुरात काँग्रेससमोर आव्हाननागपुरात भाजपकडे १०८ नगरसेवक होते व लोकसभा-विधानसभा निवडणुकीतदेखील भाजपचाच वरचष्मा दिसून आला. भाजपने विधानसभा निवडणुकीनंतर लगेच बूथ पातळीवर संघटन मजबुतीसाठी प्रयत्न सुरू केले होते. दुसरीकडे काँग्रेसनेदेखील विविध उपक्रम राबवत कार्यकर्त्यांना जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र पक्षातील गटबाजी कायमच असून त्यामुळे तिकीटवाटपादरम्यान अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री, गडकरींचे शहर असलेल्या नागपुरात काँग्रेससमोर मोठे आव्हान राहणार आहे.

अमरावतीत कुणाचा खेला होणार?अमरावती महानगरपालिकेत २२ प्रभाग असून ८७नगरसेवक तथा पाच स्वीस्कृत सदस्यांसह एकूण ९२ नगरसेवक आहेत. २०१७ मधील निवडणुकीत भाजपचे ४५, काँग्रेस १५, एमआयएम १०, शिवसेना (ठाकरे गट) ७, बसपा ५, युवा स्वाभिमान पार्टी ३, रिपाइं (आठवले गट) १ आणि एक नगरसेवक अपक्ष निवडून आले होते. २०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने खातेही उघडले नव्हते. मात्र आता अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके, विधान परिषद सदस्य संजय खोडके हे पती-पत्नी राजकीय शक्तीनिशी येत्या महानगरपालिका निवडणूक मैदानात उतरतील. तसेच शिवसेना दोन गटात विभागल्या गेल्याने ठाकरे आणि शिंदे सेना आमने-सामने असतील. विधानसभेत अमरावती जिल्ह्यात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, प्रहारचे बच्चू कडू यांचादेखील पराभव झाल्याने भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर काँग्रेससमोर मतदारांना परत खेचून आणण्याचे आव्हान आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक 2024nagpurनागपूरMuncipal Corporationनगर पालिकाVidarbhaविदर्भSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळ