दुचाकीच्या वेगावरून टोकले, तरुणाच्या मानेवरच चाकूने भोसकले

By योगेश पांडे | Updated: March 26, 2024 14:47 IST2024-03-26T14:47:45+5:302024-03-26T14:47:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : धुळवडीच्या दिवशी वेगाने दुचाकी चालविणाऱ्या सख्ख्या भावांना टोकल्याने त्यांनी एका तरुणावर चाकूने वार करत ...

Bitten by the speed of the bike, the young man was stabbed on the neck with a knife | दुचाकीच्या वेगावरून टोकले, तरुणाच्या मानेवरच चाकूने भोसकले

दुचाकीच्या वेगावरून टोकले, तरुणाच्या मानेवरच चाकूने भोसकले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धुळवडीच्या दिवशी वेगाने दुचाकी चालविणाऱ्या सख्ख्या भावांना टोकल्याने त्यांनी एका तरुणावर चाकूने वार करत गंभीर जखमी केले. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

योगेश गणेश मडावी (२०, बारसे नगर, गोंडपुरा) असे जखमीचे नाव आहे. तर बारसे नगरातीलच सुमित गणेश पांडे (२०) व सिमांषु गणेश पांडे (२१) हे सख्खे भाऊ आरोपी आहेत. सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास सुमित व सिमांषु हे दुचाकीवर वस्तीत धूम करत होते. वस्तीतून भरधाव वेगातून दुचाकी नेत ते उगाच तमाशे करत होते. यावरून योगेशने दोघांनाही टोकले व दुचाकी हळू चालविण्यास सांगितले. दोघेही भाऊ संतापले व त्यांनी योगेशला शिवीगाळ सुरू केली.

सुमितने योगेशच्या मानेवर चाकूने वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपी फरार झाले तर योगेशच्या मित्रांनी त्याला एका खाजगी इस्पितळात नेले. योगेशचा मित्र मंथन परचाके याच्या तक्ररीवरून पाचपावली पोलीस ठाण्यात आरोपी भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सुमित पांडे याला अटक केली आहे.

Web Title: Bitten by the speed of the bike, the young man was stabbed on the neck with a knife