शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

नागपुरात  रुग्णाने घेतला पोलिसाला चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 10:18 PM

डॉक्टरला शिवीगाळ करणाऱ्या रुग्णाला समजावण्यासाठी गेलेल्या एका पोलिसाला रुग्णाने मारहाण करून चावा घेतला. पकडल्यानंतर या रुग्णाने सुरक्षारक्षकालाही चावा घेऊन पळ काढला. ही घटना शुक्रवारी मेडिकल रुग्णालयांतर्गत येणाऱ्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात घडली.

ठळक मुद्दे सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर: डॉक्टरला शिवीगाळ करणाऱ्या रुग्णाला समजावण्यासाठी गेलेल्या एका पोलिसाला रुग्णाने मारहाण करून चावा घेतला. पकडल्यानंतर या रुग्णाने सुरक्षारक्षकालाही चावा घेऊन पळ काढला. ही घटना शुक्रवारी मेडिकल रुग्णालयांतर्गत येणाऱ्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात घडली.प्राप्त माहितीनुसार, आज शुक्रवारी सकाळी एक रुग्ण आपल्या आईसोबत सुपर रुग्णालयातील वॉर्ड क्र. ४३ मध्ये तपासणीसाठी आला. त्याची आई बाजूलाच बसली होती. मात्र, हा रुग्ण वारंवार डॉक्टरांकडे जाऊन डिस्टर्ब करीत होता. तो डॉक्टरांवरही भडकला. डॉक्टरांनी त्याला बसायला सांगितले. मात्र, तो ऐकतच नव्हता. त्याने डॉक्टरला धमकीही दिली होती. काय झाले अशी विचारणा करीत बाजूला असलेले इतर रुग्ण व नातेवाईकांनीही गर्दी केली. त्याच वेळी एक पोलीस कैद्याला घेऊन तपासणीसाठी आला होता. वादविवाद पाहून पोलीस मध्यस्थी करायला गेला. मात्र, या रुग्णाने मध्यस्थी करणाऱ्या पोलिसाला धक्काबुक्की करीत मारहाण केली व चावाही घेतला. डॉक्टरांनी ताबडतोब ओपीडीत कार्यरत सुरक्षारक्षकांना फोन करून वर बोलावले. (त्याच वेळी डॉक्टरने १०० क्रमांकावरही फोन केला) हिमांशु कठाळे (२२) हा सुरक्षारक्षक इतर चार सहकाऱ्यांना घेऊन वर वॉर्ड ४३ मध्ये पोहोचला. चावा घेणाऱ्या रुग्णाला ताब्यात घेऊन खाली आणले. मात्र, झटका देत रुग्णाने कठाळे यांनाही चावा घेतला आणि तुकडोजी कॅन्सर रुग्णालयाच्या दिशेने काही दूर पळून गेला. सुरक्षारक्षकांनी मागे धावून रुग्णाला पकडले. दरम्यान, १०० क्रमांकावर फोन आल्यानंतर अजनी पोलीस सुपरमध्ये पोहोचले आणि सुरक्षारक्षकांनी रुग्णाला पोलिसांच्या ताब्यात दिले. हा काही प्रमाणात मानसिक रुग्ण असल्याचे एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

टॅग्स :Policeपोलिसhospitalहॉस्पिटल