शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

‘बर्थ डे’ पार्टी बेतली जीवावर

By admin | Updated: June 17, 2016 03:05 IST

मित्रांसोबत ‘बर्थ डे पार्टी’ साजरी करण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांचा जलाशयात बुडून मृत्यू झाला.

पाच जण बुडाले : वडगाव व मोहगाव झिल्पी जलाशयातील घटना बेला/ हिंगणा : मित्रांसोबत ‘बर्थ डे पार्टी’ साजरी करण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांचा जलाशयात बुडून मृत्यू झाला. उमरेड तालुक्यातील बेला शिवारातील वडगाव जलाशयात चौघांचा मृत्यू झाला असून, एक जण बचावला. दुसरीकडे हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी जलाशयात एका तरुणाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, दोन्ही जलाशय पोहण्यासाठी प्रतिबंधित असून, तसा फलक तिथे लावण्यात आला आहे. आदित्य चरडे (१७, रा. अभिजितनगर, नागपूर), विक्की शंकर ऊ र्फ शांताराम दवंडे (२५, रा. चिंतामणीनगर, नागपूर), राहुल राजेंद्र नागदेवे (२५, रा. अभिजितनगर, नागपूर) व शुभम चरडे (२३, रा. नाचणगाव, जिल्हा वर्धा) अशी वडगाव जलाशयातील मृतांची नावे आहेत. आदित्यचा गुरुवारी (दि. १६) वाढदिवस होता. त्यामुळे त्याच्या मित्रांसोबत बर्थ डे पार्टी सेलिब्रेट करण्यासाठी वडगाव जलाशयाजवळ गेला होता. त्याच्यासोबत या चौघांशिवाय दिनेश अरुण मरकाम (१९, रा. अभिजितनगर, नागपूर) हा देखील होता. हे सर्व जण दुपारी २ वाजताच्या सुमारास जलाशयाजवळ पोहोचले. दुपारी ३ वाजताच्या सुमारास चौघेही जलाशयात पोहण्यासाठी उतरले. विशेष म्हणजे, चौघांपैकी कुणालाही पोहता येत नव्हते. दिनेशला पाण्याची भीती वाटत असल्याने तो काठावर बसून होता. पोहण्याच्या प्रयत्नात चौघेही खोल पाण्यात गेले आणि बुडायला लागले. त्यातच त्यांनी आरडाओरड केली. दिनेशनेही आरडाओरड करून मदत मागितली. परिणामी, परिसरातील नागरिकांनी जलाशयाकडे धाव घेतली. तोपर्यंत चौघेही दिसेनासे झाले होते. माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक नरसिंग शेरखाने, सहायक पोलीस निरीक्षक मोते व सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी स्थानिक कोळी दिलीप दुर्गे व वसंता शेंडे यांच्या मदतीने चौघांचे मृतदेह बाहेर काढले. दुसरी घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहगाव झिल्पी तलावात बुधवारी दुपारी घडली असून, त्याचा मृतदेह गुरुवारी दुपारी पाण्याबाहेर काढण्यात आला.