नागपुरातील रेशीमबाग मैदानावर जैविक कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 23:05 IST2019-07-05T23:03:59+5:302019-07-05T23:05:29+5:30
रेशीमबाग मैदानावर शुक्रवारी वापरलेले इंजेक्शन आढळून आल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे, रात्री रेशीमबाग मैदानात गैरप्रकार सुरू असतात. या इंजेक्शनचा वापर ड्रग्ज घेण्यासाठी झाला असावा, असे बोलले जात आहे.

नागपुरातील रेशीमबाग मैदानावर जैविक कचरा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेशीमबाग मैदानावर शुक्रवारी वापरलेले इंजेक्शन आढळून आल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे, रात्री रेशीमबाग मैदानात गैरप्रकार सुरू असतात. या इंजेक्शनचा वापर ड्रग्ज घेण्यासाठी झाला असावा, असे बोलले जात आहे.
जैविक कचऱ्याचे (बायोमेडिकल वेस्ट) संकलन, वर्गीकरण, प्रक्रिया, उपचार व विल्हेवाट यांचे व्यवस्थापन मानव व पर्यावरणासाठी निकोप होण्याच्या दृष्टीने ‘बायो मेडिकल वेस्ट हॅण्डलिंग रुल्स’चे पालन होणे आवश्यक असते. यासाठी महानगरपाालिकेने सर्व रुग्णालयांमधून बायोमेडिकल वेस्ट उचलण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला दिले आहे. ही कंपनी प्रत्येक खाटामागे विशिष्ट शुल्क आकारुन रुग्णालयातील ‘बायोमेडिकल वेस्ट’ उचलते. मात्र त्यानंतरही हा कचरा थोड्याअधिक प्रमाणात उघड्यावर दिसून येतो. शुक्रवारी सकाळी रेशीमबाग मैदानावर खेळण्यासाठी आलेल्या मुलांना वापरलेले इंजेक्शन दिसल्याने ‘बायोमेडिकल वेस्ट’चा प्रश्न पुन्हा समोर आला. येथील खेळाडूंच्या मते, रात्री या मैदानावर गैरप्रकार सुरू असतो. यामुळे सकाळी दारूच्या फुटलेल्या बॉटल्स, प्लास्टिकचे ग्लास, सिगारेटचे रिकामे पॅकेट्स जागोजागी पडलेले असतात. आता यात ‘बायोमेडिकल वेस्ट’चीही भर पडली आहे. ड्रग्ज घेण्यासाठी इंजेक्शनचा वापर होत असल्याचे येथील खेळाडूंचे म्हणणे होते.