नागपुरात जेसीबीच्या धडकेत दुचाकीचालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 22:05 IST2018-07-12T22:02:51+5:302018-07-12T22:05:59+5:30
भरधाव जेसीबीची धडक बसल्याने अॅक्टिव्हा चालकाचा करुण अंत झाला. जयपाल अर्जुनदास चावल (वय ५६) असे मृताचे नाव आहे. बुधवारी रात्री १०.३० वाजता कामठी मार्गावरील इंदोरा चौकात हा भीषण अपघात घडला.

नागपुरात जेसीबीच्या धडकेत दुचाकीचालक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भरधाव जेसीबीची धडक बसल्याने अॅक्टिव्हा चालकाचा करुण अंत झाला. जयपाल अर्जुनदास चावल (वय ५६) असे मृताचे नाव आहे. बुधवारी रात्री १०.३० वाजता कामठी मार्गावरील इंदोरा चौकात हा भीषण अपघात घडला.
आशीनगर टेका नाका परिसरात राहणारे जयपाल चावल बुधवारी रात्री त्यांच्या अॅक्टिव्हाने (एमएच ३१/ सीएफ १८४२) जात असताना मेट्रोच्या कामावर असलेल्या जेसीबी (एमएच ४९/ एएस ७५९१)च्या चालकाने जयपाल चावल यांना जोरदार धडक मारली. त्यामुळे त्यांचा करुण अंत झाला. अपघातानंतर लोक धावून येत असल्याचे पाहून आरोपी चालक तेथून पळून गेला. अपघातामुळे तेथे तणाव निर्माण झाला. माहिती कळताच जरीपटका पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी जमावाला शांत केले. जिमी जयपाल चावल (वय ३४) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी जेसीबीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.