भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By दयानंद पाईकराव | Updated: April 10, 2024 16:40 IST2024-04-10T16:39:54+5:302024-04-10T16:40:07+5:30

अज्ञात भरधाव वाहनाने मानेवाडा सिमेंट रोडवर समोरून गौरवच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

bike rider killed in collision with speeding vehicle | भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

दयानंद पाईकराव, नागपूर : भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे दुचाकीवर स्वार युवक ठार झाला. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत बुधवारी रात्री १.३० वाजताच्या सुमारास मानेवाडा सिमेंट रोडवर घडली. मुळचा आयुषनगर तुकुम चंद्रपूर येथील रहिवासी असलेला गौरव श्रीधर वांढरे (२६, ह. मु. भोलेनगर हुडकेश्वर) हा आपली दुचाकी क्रमांक एम. एच. ३४, सी. जी-४९१३ ने घरी जात होता.

अज्ञात भरधाव वाहनाने मानेवाडा सिमेंट रोडवर समोरून गौरवच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. अपघातात गौरव गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सुरुवातीला खाजगी रुग्णालयात व तेथून मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी निलेश राजेश शर्मा (३२, रा. उदयनगर हुडकेश्वर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध कलम २७०, ३०४ (अ), सहकलम १३४, १७७ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

Web Title: bike rider killed in collision with speeding vehicle

टॅग्स :Accidentअपघात