उन्हात उभी असलेली दुचाकी पाच मिनिटांत खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 19:58 IST2022-04-20T19:57:44+5:302022-04-20T19:58:17+5:30

Nagpur News बुधवारी दक्षिण नागपुरातील महाकाली चौकात उन्हात रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीने पेट घेतला अन् पाच मिनिटांत ही दुचाकी जळून खाक झाली.

bike burnt in the sun in five minutes | उन्हात उभी असलेली दुचाकी पाच मिनिटांत खाक

उन्हात उभी असलेली दुचाकी पाच मिनिटांत खाक

ठळक मुद्देदक्षिण नागपूरच्या महाकाली चौकातील घटना

 

नागपूर : कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले असताना बुधवारी दक्षिण नागपुरातील महाकाली चौकात उन्हात रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीने पेट घेतला अन् पाच मिनिटांत ही दुचाकी जळून खाक झाली.

दक्षिण नागपुरातील अमरनगरकडे जाणाऱ्या मार्गावर महाकाली चौक आहे. या चौकात नीलेश बाईक सर्व्हिस सेंटरच्या समोर प्लेझर ही गाडी उभी होती. दुपारी १२.५५ वाजताच्या सुमारास या दुचाकीने अचानक पेट घेतला. काही कळायच्या आत दुचाकी भडकली आणि पाच मिनिटांत ती जळून खाक झाली. या दुचाकीला कशामुळे आग लागली, याचे कारण समजू शकले नाही. परंतु उन्हामुळे ही दुचाकी पेटली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी आजूबाजूला उभ्या असलेल्या नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केल्याने आग नियंत्रणात आली. बाजूलाच उभ्या असलेल्या इतर दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी जाण्यापासून वाचविण्यात नागरिकांना यश आले. ही गाडी एका महाविद्यालयीन युवतीची असल्याची माहिती आहे.

.............

Web Title: bike burnt in the sun in five minutes

टॅग्स :fireआग