शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते अपघात मोठी समस्या

By admin | Updated: January 2, 2017 02:40 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी रस्ते अपघाताबाबत गंभीर चिंता व्यक्त करून देशात दरवर्षी पाच लाख अपघात

नितीन गडकरी यांची चिंता : वाहतूक नियम पाळण्याचे नागरिकांना आवाहन नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी रस्ते अपघाताबाबत गंभीर चिंता व्यक्त करून देशात दरवर्षी पाच लाख अपघात होतात व त्यात दीड लाख लोकांचा मृत्यू होतो, अशी माहिती दिली. पं. दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स रिसर्च अ‍ॅन्ड ह्युमन रिसोर्सेस नागपूरच्या जननी सेहत अभियानाचा गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. गडकरी यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी रुग्णवाहिका खरेदी करण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेचे व इन्स्टिट्यूटच्या जननी सेहत रथाचे लोकार्पणही गडकरी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. गडकरी पुढे म्हणाले, बहुतेक अपघात निष्काळजीपणामुळे होतात. वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन केले जात नाही. कुणी दारू पिऊन वाहन चालवितो तर, कुणी वाहन चालविताना मोबाईलवर बोलत असतो. याशिवाय बोगस परवाने मिळविणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे. अपघात कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गांवरील ३८ अपघातग्रस्त स्थळांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याचे काम सुरू झाले आहे. गडकरी यांनी स्वत:च्या अपघाताचा अनुभव सांगितला. कार अपघातात पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे दोन वर्षे निष्क्रिय पडून राहावे लागले. यात संपूर्ण कुटुंब भरडल्या गेले असे त्यांनी सांगून नागरिकांना वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन केले. सध्या संपूर्ण आकाश फाटले आहे. ते शिवण्याची आपली क्षमता नाही. तरीपण दिव्याप्रमाणे तेवत राहून कार्य करणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. व्यासपीठावर महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर कोहळे, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार विकास कुंभारे, मनपा स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत, चित्रपट दिग्दर्शिका समृद्धी पोरे, आयटी तज्ज्ञ पल्लवी मोहन, उद्योजक रामाकृष्णन राममूर्ती, माजी महापौर अर्चना डेहनकर, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, इन्स्टिट्युटचे डॉ. विरल कामदार, श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी) गोरगरिबांमध्ये देव खायला अन्न, घालायला कपडे व राहायला घर नाही अशा गोरगरीब लोकांना देव माणून त्यांची सेवा केली पाहिजे अशी पं. दीनदयाल उपाध्याय यांची भूमिका होती. संत तुकाराम यांनीही हाच संदेश दिला होता. हा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून वाटचाल करीत आहे. काही दिवसांपूर्वी अनेक दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयवांसह आवश्यक साहित्यांचे वितरण केले. त्यावेळी झालेला आनंद हा निवडणूक जिंकल्यानंतर व मंत्रिपद वाट्याला आल्यानंतर झालेल्या आनंदापेक्षा मोठा होता असे गडकरी यांनी सांगितले. स्तन कर्करोगाविरुद्ध लढा स्तन कर्करोगाचे निदान वेळेत व्हावे यासाठी जननी सेहत अभियान सुरू करण्यात आले आहे. गडकरी यांनी याविषयावरही विचार व्यक्त केले. महिला स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक नाहीत. स्तनांमधील गाठींकडे दुर्लक्ष केले जाते. ही गाठ कर्करोगाची असल्यास वेळेवर निदान होणे आवश्यक असते. अन्यथा महिलेचे प्राण वाचू शकत नाही. महिलांनी स्तन कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात सहभागी व्हावे. येणाऱ्या काळात जिल्ह्यामध्ये एकाही महिलेचा मृत्यू स्तन कर्करोगाने व्हायला नको असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.